रिसालदार गल्लीत कचऱ्याचा ढीग
उचल करण्याकडे दुर्लक्ष, मनपा लक्ष देणार का?
बेळगाव : शहरातील कचऱ्याची उचल न करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी घडू लागला आहे. रिसालदार गल्ली येथे गटारीतून काढण्यात आलेला कचऱ्याचा ढीग गटारी शेजारीच फेकण्यात आला आहे. त्यामुळे ये-जा करताना वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. मध्यंतरी कचऱ्याची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. मात्र आता काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रिसालदार गल्लीमध्ये कचऱ्याचे ढीग तसेच ठेवण्यात आले आहेत, तेव्हा त्याची उचल कराव़ी. शहर तसेच उपनगरांमध्ये घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जातो. मात्र अनेक ठिकाणी कचरा फेकण्यात येतो. तेव्हा संबंधित प्रभागाच्या आरोग्य निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्या कचऱ्याची उचल करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे.
Home महत्वाची बातमी रिसालदार गल्लीत कचऱ्याचा ढीग
रिसालदार गल्लीत कचऱ्याचा ढीग
उचल करण्याकडे दुर्लक्ष, मनपा लक्ष देणार का? बेळगाव : शहरातील कचऱ्याची उचल न करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी घडू लागला आहे. रिसालदार गल्ली येथे गटारीतून काढण्यात आलेला कचऱ्याचा ढीग गटारी शेजारीच फेकण्यात आला आहे. त्यामुळे ये-जा करताना वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. मध्यंतरी कचऱ्याची […]