लोककल्प-वेणुग्राम हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

बेळगाव : लोककल्प फौंडेशन व वेणुग्राम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील माण, चापोली व कापोली या खेड्यांमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत वरील तीन गावांसह 32 गावे दत्तक घेण्यात आली आहेत. या अंतर्गत हे शिबिर घेण्यात आले. वेणुग्राम हॉस्पिटलच्या डॉ. सुषमा सुतार, नर्सिंग विभागाचे जगदीश बेळगावकर, पीआरओ योगेश देशपांडे […]

लोककल्प-वेणुग्राम हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

बेळगाव : लोककल्प फौंडेशन व वेणुग्राम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील माण, चापोली व कापोली या खेड्यांमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत वरील तीन गावांसह 32 गावे दत्तक घेण्यात आली आहेत. या अंतर्गत हे शिबिर घेण्यात आले. वेणुग्राम हॉस्पिटलच्या डॉ. सुषमा सुतार, नर्सिंग विभागाचे जगदीश बेळगावकर, पीआरओ योगेश देशपांडे यांनी रुग्णांची बीपी, ब्लडशुगर, उंची तपासून त्यांना लोककल्पतर्फे मोफत औषधे देण्यात आली. 160 हून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला.