लोककल्पतर्फे गवाळीत आरोग्य शिबिर
बेळगाव : लोककल्प फौंडेशनच्यावतीने केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या सहकार्याने खानापूर तालुक्यातील गवाळी येथील कम्युनिटी सेंटरमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. यावेळी 70 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी प्रत्येकाच्या आरोग्य समस्या जाणून घेऊन त्यांना सल्ला दिला. या शिवाय रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी तपासली. ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्या यांच्या क्रियेबद्दल माहितीही देण्यात आली. यावेळी हॉस्पिटलच्या डॉ. दिव्या, डॉ. उत्तम, डॉ. बागमी, डॉ. समर्थ, डॉ. मौनेश, डॉ. तान्ह्या व पीआरओ श्रीधर तसेच फौंडेशनचे कर्मचारी सूरजसिंग राजपूत, स्वयंसेवक संतोष कदम, अनंत गावडे आणि सुहासिनी पेडणेकर उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी लोककल्पतर्फे गवाळीत आरोग्य शिबिर
लोककल्पतर्फे गवाळीत आरोग्य शिबिर
बेळगाव : लोककल्प फौंडेशनच्यावतीने केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या सहकार्याने खानापूर तालुक्यातील गवाळी येथील कम्युनिटी सेंटरमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. यावेळी 70 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी प्रत्येकाच्या आरोग्य समस्या जाणून घेऊन त्यांना सल्ला दिला. या शिवाय रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी तपासली. ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्या यांच्या क्रियेबद्दल माहितीही देण्यात आली. यावेळी […]