लोककल्प फाऊंडेशनच्यावतीने हुळंद गावात आरोग्य शिबिर

बेळगाव : लोकमान्य सोसायटीच्या लोककल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील दुर्गम भागामध्ये वैद्यकीय सेवा पोहोचविल्या जात आहेत. हुळंद (ता. खानापूर) येथे केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या सहकार्याने सामान्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 60 हून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. दुर्गम भागातील नागरिकांना वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी लोककल्प फाऊंडेशनच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जात आहेत. […]

लोककल्प फाऊंडेशनच्यावतीने हुळंद गावात आरोग्य शिबिर

बेळगाव : लोकमान्य सोसायटीच्या लोककल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील दुर्गम भागामध्ये वैद्यकीय सेवा पोहोचविल्या जात आहेत. हुळंद (ता. खानापूर) येथे केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या सहकार्याने सामान्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 60 हून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. दुर्गम भागातील नागरिकांना वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी लोककल्प फाऊंडेशनच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जात आहेत. मंगळवारी झालेल्या या शिबिरावेळी डॉ. रोहन मोहनदास, डॉ. नम्रता, डॉ. मंजुनाथ वाली, डॉ. स्नेहल, डॉ. सेजल कटारिया यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.