लोककल्पतर्फे देवाचीहट्टी येथे आरोग्य शिबिर

बेळगाव : लोकमान्य को-ऑप. सोसायटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत लोककल्प फौंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील 32 गावे दत्तक घेण्यात आली आहेत. या गावांमध्ये सातत्याने आरोग्य शिबिरे घेऊन दुर्गम गावातील लोकांना आरोग्य सेवा देण्यात येते. नुकतेच तालुक्यातील देवाचीहट्टी गावात वेणुग्राम हॉस्पिटलच्या सहकार्याने शिबिर घेण्यात आले. यावेळी रुग्णांची आरबीएस, बीपी तपासणी करण्यात येऊन विनामूल्य औषधे देण्यात आली. 72 हून अधिक जणांनी […]

लोककल्पतर्फे देवाचीहट्टी येथे आरोग्य शिबिर

बेळगाव : लोकमान्य को-ऑप. सोसायटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत लोककल्प फौंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील 32 गावे दत्तक घेण्यात आली आहेत. या गावांमध्ये सातत्याने आरोग्य शिबिरे घेऊन दुर्गम गावातील लोकांना आरोग्य सेवा देण्यात येते. नुकतेच तालुक्यातील देवाचीहट्टी गावात वेणुग्राम हॉस्पिटलच्या सहकार्याने शिबिर घेण्यात आले. यावेळी रुग्णांची आरबीएस, बीपी तपासणी करण्यात येऊन विनामूल्य औषधे देण्यात आली. 72 हून अधिक जणांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी लोककल्पचे प्रसाद असुकर, स्वयंसेवक संतोष कदम, अनंत गावडे तसेच हॉस्पिटलच्या डॉ. सुषमा सुतार, पीआरओ जगदीश बेळगावकर, योगेश देशपांडे उपस्थित होते.