लोककल्प फौंडेशनतर्फे चापगावात आरोग्य शिबिर

बेळगाव : लोककल्प फाऊंडेशनतर्फे केएलई आयुर्वेदिक रुग्णालय शहापूरच्या सहकार्याने खानापूर तालुक्यातील चापगावमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये वैयक्तिक सल्ला, त्यानुसार उपचार सांगून मोफत औषधे देण्यात आली. तसेच पारंपरिक आयुर्वेदिक उपचार, हर्बल उपचार, जीवनशैलीत आवश्यक ते बदल आणि पोषक आहार याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेडचे संस्थापक व अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या […]

लोककल्प फौंडेशनतर्फे चापगावात आरोग्य शिबिर

बेळगाव : लोककल्प फाऊंडेशनतर्फे केएलई आयुर्वेदिक रुग्णालय शहापूरच्या सहकार्याने खानापूर तालुक्यातील चापगावमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये वैयक्तिक सल्ला, त्यानुसार उपचार सांगून मोफत औषधे देण्यात आली. तसेच पारंपरिक आयुर्वेदिक उपचार, हर्बल उपचार, जीवनशैलीत आवश्यक ते बदल आणि पोषक आहार याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेडचे संस्थापक व अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या प्रयत्नातून खानापूर तालुक्यातील 32 गावे दत्तक घेण्यात आली आहेत. या गावांतील आरोग्य, शैक्षणिक विकासासाठी लोककल्प कार्यरत आहे. शिबिराप्रसंगी लोककल्प फाऊंडेशनचे कर्मचारी सूरजसिंग राजपूत, स्वयंसेवक सुहास पेडणेकर, सुहासिनी पेडणेकर तसेच केएलई आयुर्वेदिक रुग्णालयाचे डॉ. रेवण्णा, डॉ. भारती, डॉ. पूजा, डॉ. ऐश्वर्या, डॉ. सागर व पीआरओ श्रीधर उपस्थित होते.