लोककल्प फौंडेशन-वेणुग्राम हॉस्पिटलतर्फे आमगावात आरोग्य शिबिर

बेळगाव : लोककल्प फौंडेशन, वेणुग्राम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आमगाव या दुर्गम गावामध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी वेणुग्रामचे जगदीश बेळगावकर, पीआरओ योगेश देशपांडे, डॉ. ऐश्वर्य व डॉ. दीपाली आणि नर्सिंग स्टाफ उपस्थित होता. यावेळी रक्तातील साखर, रक्तदाब तपासणी करून आमगावमधील ग्रामस्थांसाठी मोफत औषधे देण्यात आली. लोकमान्य सोसायटीच्या लोककल्प फौंडेशनने चेअरमन किरण ठाकुर यांच्या पुढाकाराने […]

लोककल्प फौंडेशन-वेणुग्राम हॉस्पिटलतर्फे आमगावात आरोग्य शिबिर

बेळगाव : लोककल्प फौंडेशन, वेणुग्राम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आमगाव या दुर्गम गावामध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी वेणुग्रामचे जगदीश बेळगावकर, पीआरओ योगेश देशपांडे, डॉ. ऐश्वर्य व डॉ. दीपाली आणि नर्सिंग स्टाफ उपस्थित होता. यावेळी रक्तातील साखर, रक्तदाब तपासणी करून आमगावमधील ग्रामस्थांसाठी मोफत औषधे देण्यात आली. लोकमान्य सोसायटीच्या लोककल्प फौंडेशनने चेअरमन किरण ठाकुर यांच्या पुढाकाराने खानापूर तालुक्यातील 32 गावे दत्तक घेतली आहेत. याठिकाणी सर्व आरोग्य सुविधा पोहचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच अंतर्गत हे शिबिर पार पडले. यावेळी लोककल्प फौंडेशनचे कर्मचारी सुरजसिंग राजपूत, स्वयंसेवक संतोष कदम उपस्थित होते.