धैर्यशील माने ठरले ‘डार्कहॉर्स’! काटाजोड लढतीत मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात मारली बाजी

धैर्यशील माने ठरले ‘डार्कहॉर्स’! काटाजोड लढतीत मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात मारली बाजी

सत्यजीत पाटील यांचा निसटता पराभव; स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचे गणित चुकले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनितीचा विजय

कृष्णात चौगले कोल्हापूर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या तिरंगी लढतीमध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात निर्णायक आघाडी घेत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील यांना पराभव केला. शिवसेनेच्या विभाजनानंतर ठाकरे गटाला मिळालेली सहानुभूती, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने दिलेली ताकद आणि एक नवीन चेहरा म्हणून सत्यजीत पाटील यांना जनमताचा कौल मिळेल असे प्रथमदर्शनी चित्र होते. पण सर्व राजकीय तज्ञ आणि एक्झिट पोलचा अंदाजा खोडून काढत खासदार माने यांच्या मताधिक्यामध्ये 15 व्या फेरीनंतर वाढ होत गेली. परिणामी मशाल प्रभावहीन ठरली असून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची पुन्हा एकदा शिट्टी वाजली आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, ा†शरोळ, इस्लामपूर व ा†शराळा या सहा ा†वधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. हा लोकसभा मतदारसंघ ऊस पट्टयात येतो. त्यामुळे ऊस दर चळवळीच्या माध्यमातून स्वा†भमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचे वर्चस्व आहे. परिणामी 2009 च्या ा†नवडणुकीत राजू शेट्टी 4 लाख 81 हजार 025 मते घेऊन तर 2014 च्या ा†नवडणुकीत 6 लाख 40 हजार 428 मते घेऊन ा†वजयी झाले होते. 2009 च्या ा†नवडणुकीत राष्ट्रवादीचा तर 2014 च्या ा†नवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र राजू शेट्टी यांचा तत्कालिन शिवसेनेचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी 96 हजार मतांनी पराभव केला होता. त्यांचा हा विजय राज्यात नव्हे तर देशात चर्चेचा विषय ठरला होता. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी हे पुन्हा परस्परविरोधात मैदानात उतरले असले तरी या दोघांत महाविकास आघाडीने सत्यजीत पाटील यांच्या माध्यमातून तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला. त्यामुळे प्रथमदर्शनी दुरंगी वाटणारी निवडणूक तिरंगी झाली. यामध्ये खासदार माने यांनी सलग दुसऱ्या वेळेस बाजी मारली.
शेट्टींनी ‘स्वाभिमानी’ बाणा जपला अन् निर्णय चुकला
निवडणुकीच्या सुरूवातीच्या टप्प्यात राजू शेट्टी हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील असे चित्र होते. मविआकडून हातकणंगलेची जागा शिवसेना उबाठा गटाला दिली असल्यामुळे शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठींबा देण्याची मागणी केली होती. पण ठाकरे यांनी मशाल चिन्हावरच निवडणूक लढवावी अशी अट घातल्यामुळे शेट्टी यांनी त्यास नकार दिला. मशाल चिन्हावर निवडणूक लढवली तर स्वाभिमानीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सुरू असेलेली शेतकरी चळवळ मोडीत निघेल असे स्पष्ट करून त्यांनी आपला स्वाभिमानी बाणा जपाला. पण एकंदरीत निकालानंतरचे चित्र पाहता हा निर्णय त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्यजीत पाटील आणि राजू शेट्टी यांना मिळालेल्या मतांची बेरीज पाहता शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली असती तर सध्या वेगळे चित्र पहावयास मिळाले असते.
राज्य आणि देश पातळीवरील नेत्यांच्या जोडण्या ठरल्या यशस्वी
शेट्टी यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर उबाठा गटाने पन्हाळा-शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले. आणि अवघ्या महिनाभराच्या कालावधीत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत प्रचाराच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार माने आणि शेट्टी यांच्याशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एक नवीन चेहरा, उद्धव ठाकरे यांना असणारी सहानुभूती आणि महाविकास आघाडीच्या अन्य घटक पक्षांनी दिलेले पाठबळ यामुळेच पाटील यांना विजयी गुलाल लागेल असा अंदाज होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरात तळ ठोकून आखलेली रणनिती अखेर यशस्वी ठरली आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्य आणि देशपातळीवरील अनेक नेते, सिने अभिनेते आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही काही काळ कोल्हापूरात येऊन जोडण्या लावल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर या मतदारसंघाची प्रचारयंत्राणा स्वत: हातात घेतली होती. आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह अनेक नाराजांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करून पाठींबा मिळवला. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात धैर्यशील माने यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. त्याचाच फायदा झाला असल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
माने घराण्याकडे नववी खासदारकी
1952 ते 61 दरम्यान लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता. 1962 ला तो अस्तित्वात आला. तेव्हा या मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कृष्णाजी लक्ष्मण मोरे विजयी झाले. तर 1967 मध्ये वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाच्या महाराणी विजयमाला विजयी झाल्या. तर 1971 मध्ये ही जागा दत्ताजीराव बाबुराव कदम यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिंकली. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर 1976 मध्ये इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. 1977, 1980, 1984, 1989 आणि 1991 च्या सलग पाच निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजाराम ऊर्फ बाळासाहेब माने विजयी झाले. तर 1996 व 1998 च्या निवडणुकीत कलाप्पाण्णा आवाडे विजयी झाले. त्यानंतरच्या 1999 व 2004 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवेदिता माने विजयी झाल्या. तर 2008 मध्ये पुन्हा लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन हातकणंगले मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यानंतर 2009 व 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी विजयी झाले. 2019 मध्ये धैयशील माने हे माने घराण्यातील तिसरे खासदार झाले. या मतदारसंघातील खासदारकीचा इतिहास पाहता जनतेने माने घराण्याकडे नऊ वेळेस खासदारकी दिली आहे.
होमपिचवर राजू शेट्टी पिछाडीवर
शिरोळ तालुका हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण याच बालेकिल्ल्यातून धैयैशील माने यांनी 5 हजार 700 मतांनी आघाडी घेतली आहे. इचलकरंजीतूनही माने यांना सर्वाधिक 38 हजार 400, हातकणंगलेतून 17 हजार 472 मतांनी आघाडी मिळवली आहे. तर वाळवा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांनी 17 हजार शिराळातून 9 हजार तर पन्हाळा शाहूवाडीतून 18 हजार 980 मताधिक्य मिळवले आहे. यामध्ये सर्वच विधानसभा मतदारसंघातून राजू शेट्टी पिछाडीवर राहिले.