माझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे महाविकास आघाडीनं ठरवावं- राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुकीसाठी सध्या ऐकला चलो रे अशी भूमिका घेतली असून आम्हाला कुणाचा प्रस्ताव नाही. पण माझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवावं. म माझ्या विरोधात उमेदवार दिला नाही तर मी स्वागतच करेन असेही ते म्हणाले. तसेच या देशात व्यक्ती केंद्रित राजकारण कधीच टिकलं नाही. त्यामुळे भाजपने मोदी का परिवार असे म्हणण्यापेक्षा आम आदमी का परिवार असं म्हटलं पाहीजे असा टोलाही त्यांनी लगावला.
पहा VIDEO >>> माझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही ते महाविकास आघाडीने ठरवावं…
लोकसभेच्या आचारसंहितेच्या तोंडावर सध्या राजकिय वातावरण तापत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले मतदारसंघात दौरा पूर्ण झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र भूमिका घेतल्याचं स्वागत शेतकरी वर्गातून होत आहे. मला महाविकास आघाडीकडून कोणत्याही बैठकीचं निमंत्रण नसल्याने आम्ही ऐकला चलो रे…भूमिका घेतली आहे. पण महाविकास आघाडीने माझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं. त्यांनी माझ्या विरोधात उमेदवार दिला नाही तर मी स्वागतच करेन. आम्ही लोकसभेच्या 5 ते 6 जागा लढवण्याची तयारी केली आहे. मी माझी निवडणूक मतदारांवर सोडली आहे त्यांनीच ठरवायचं आहे माझं काय करायचं.” असंही ते म्हणाले.
शक्तीपीठ महामार्गावर टीका
राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गाची घोषणा केल्यानंतर त्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यावर बोलताना ते म्हणाले, “राज्यात एक महामार्ग असताना शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन नवीन महामार्ग का? शेतकऱ्यांचे थडगे बांधून कुणाचे मनोरे यांना उभा करायचे आहेत.
ठराविक साखर कारखान्यांना थकहमी
राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडून ठराविक साखर कारखान्यांना थकहमी दिली जात असल्याचा आरोप केला. त्यांनी विशिष्ट पक्षाच्या नेत्यांच्या साखर कारखान्याला थकहमी कशी ? असा सवाल करून अजित पवार यांनी सत्तेत नसताना हमी देण्यास विरोध केला होता त्यावेळी मी समर्थन केले होतं. मात्र आता विशिष्ट पक्षाच्या नेत्यांच्या कारखान्याला हमी दिली जात आहे. त्यामध्ये देखील राजकारण केलं जाऊन पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला मात्र कोणतीच हमी दिली जात नसल्याचा थेट आरोप केला.
सुळकुड योजना हा केवळ फार्स
हाकरणंगले मतदार संघामध्ये इचलकरंजी शहराला देण्यात येणाऱ्या सुऴकुड योजनेवरून वातावरण चांगलेच तापत आहे. यावर बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुळकुड पाणी योजनेबाबत बोलावलेली बैठक केवळ फार्स असल्याचं म्हटलं आहे. तसेच या योजनेतून पाणी द्यायचं नव्हतं तर मंजुरी कशी दिली असा सवालही केला. हसन मुश्रीफ यांनी योजना मंजूर केल्यानंतर इचलकरंजी इथं साखर वाटल्याची आठवण करून देताना आताच हसन मुश्रीफ यांना योजनेला विरोध करावा असं का वाटत आहे असा थेट सवालही त्यांनी केला.
भाजपवर टिका
भाजपच्या मोदी का परिवार या मोहीमेवर भाष्य करताना त्यांनी देशाचे राजकारण कधीच व्यक्ती केंद्रित झालं नाही आणि जरी झालं तरी ते फार काळ टिकलं नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे भाजपने ‘मोदी का परिवार’ पेक्षा ‘आम आदमी का परिवार’ असा प्रचार करावा. कारण हा देश कुणाच्याही बापाचा नाही असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.
Home महत्वाची बातमी माझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे महाविकास आघाडीनं ठरवावं- राजू शेट्टी
माझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे महाविकास आघाडीनं ठरवावं- राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुकीसाठी सध्या ऐकला चलो रे अशी भूमिका घेतली असून आम्हाला कुणाचा प्रस्ताव नाही. पण माझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवावं. म माझ्या विरोधात उमेदवार दिला नाही तर मी स्वागतच करेन असेही ते म्हणाले. तसेच या देशात व्यक्ती केंद्रित राजकारण कधीच टिकलं नाही. त्यामुळे भाजपने मोदी का […]