हरियाणा महिला हॉकी संघ विजेता
वृत्तसंस्था/ पुणे
हॉकी इंडियाच्या येथे झालेल्या 14 व्या वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद हरियाणाच्या महिला हॉकी संघाने पटकावले. या स्पर्धेतील चुरशीच्या अंतिम सामन्यात हरियाणाने महाराष्ट्राचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 3-0 असा पराभव केला.
महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यातील हा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. हरियाणाच्या महिला संघाने आतापर्यंत ही स्पर्धा तीनवेळा जिंकली आहे. 2013 आणि 2020 साली हरियाणाच्या महिला संघाने राष्ट्रीय जेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात हरियाणाने 26 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर आपले खाते उघडले. हरियाणाच्या दीपिकाने हा महत्त्वाचा गोल केला. त्यानंतर अक्षता ढेकळेने महाराष्ट्राला बरोबरीत नेताना एक शानदार गोल केला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ बरोबरीत राहिल्याने पंचांनी ही कोंडी फोडण्यासाठी पेनल्टी शुटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शुटआऊटमध्ये हरियाणातर्फे नवनीत कौर, उषा आणि सोनिका यांनी तर महाराष्ट्रातर्फे प्रियांका वानखेडे, आकांक्षा सिंग आणि ऋतुजा पिसाळ यांना गोल नोंदवता आले नाही. या स्पर्धेमध्ये झारखंडने तिसरे स्थान मिळवताना मध्यप्रदेशचा 2-0 असा पराभव केला. मध्यप्रदेशतर्फे तिसऱ्या मिनिटाला संगीता कुमारीने मैदानी गोल तर 59 व्या मिनिटाला सुप्रिया मुंडूने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून झारखंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
Home महत्वाची बातमी हरियाणा महिला हॉकी संघ विजेता
हरियाणा महिला हॉकी संघ विजेता
वृत्तसंस्था/ पुणे हॉकी इंडियाच्या येथे झालेल्या 14 व्या वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद हरियाणाच्या महिला हॉकी संघाने पटकावले. या स्पर्धेतील चुरशीच्या अंतिम सामन्यात हरियाणाने महाराष्ट्राचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 3-0 असा पराभव केला. महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यातील हा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. हरियाणाच्या महिला संघाने आतापर्यंत […]
