एटीएम फोडणाऱ्या हरियाणातील त्रिकुटाला अटक
बिदर पोलिसांची कारवाई : चिकोडी, अंकली, यमकनमर्डी येथील एटीएम फोडीची कबुली
बेळगाव : बेळगावसह महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या तीन राज्यांत एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीतील त्रिकुटाचे बिदर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीतील आणखी चारजण फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. यमकनमर्डी, चिकोडी, अंकली येथे झालेल्या एटीएम फोडीची या त्रिकुटाने कबुली दिली आहे. तिनही आरोपी हरियाणामधील राहणारे असून मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी बिदर जिल्ह्यात तीन, बेळगावसह कर्नाटकातील इतर जिल्ह्यात पाच, महाराष्ट्रात तीन, तेलंगणामध्ये एक असे एकूण 12 एटीएम फोडून कोट्यावधी रुपये पळविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. बिदरचे जिल्हा पोलीस प्रमुख चन्नबसवण्णा एस. एल. यांनी ही माहिती दिली आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महेश मेगण्णवर, पोलीस उपअधीक्षक शिवणगौडा पाटील, पोलीस उपअधीक्षक गुंडप्पा रे•ाr, पोलीस निरीक्षक जी. एस. न्यामेगौडा, हनुम रे•ाr आदींनी ही कारवाई केली आहे. शाहीद कमल खान (वय 45, रा. नावली, जि. मेवत), अलीम उर्फ रिहान अकबर खान (वय 26, रा. भंगो, जि. मेवत), इलियास अब्दुल रेहमान (वय 45 रा. मठेपूर, जि. मल्लवल्ल) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा आंतरराज्य गुन्हेगारांची नावे आहेत.
त्यांचे आणखी चौघे साथीदार अद्याप फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या टोळीतील गुन्हेगारांनी देशाची राजधानी दिल्ली, ओडीसा येथेही एटीएम फोडल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, व तेलंगणामधील 12 एटीएम फोडून या टोळीने 1 कोटी 58 लाख रुपये पळवले असून त्यांच्याजवळून 9 लाख 50 हजार रुपये रोखरक्कम, एचआर 26 ईपी 9967 क्रमांकाची क्रेटा कार जप्त करण्यात आली आहे. बिदर जिल्ह्यातील हळ्ळीखेड, बसवकल्याण, विजापूर, यमकनमर्डी, चिकोडी, अंकली, महाराष्ट्रातील उमरगा, ठाणे, तेलंगणा येथे या टोळीतील गुन्हेगारांनी एटीएम मशीन फोडून रक्कम पळविली आहे. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून रक्कम पळविण्यात या टोळीतील गुन्हेगार तरबेज आहेत. त्यांनी देशभरात गुन्हे केले असून सध्या कर्नाटक, महाराष्ट्र व तेलंगणा या तीन राज्यातील 12 गुन्हे उघडकीस आले असून फरारी चौकडीला अटक केल्यानंतर आणखी माहिती बाहेर पडणार आहे. एखाद्या गावतील एटीएम फोडल्यानंतर टोलनाके चुकविण्यासाठी गुगल मॅपच्या साहाय्याने या टोळीतील गुन्हेगार वाहने चालवित होते. आपल्या वाहनांना बनावट नंबर प्लेट घालून तपास यंत्रणेला चकविण्यात येत होते. अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाकडून रोख रकमेसह एटीएम मशीन फोडण्यासाठी वापरण्यात येत असलेले गॅस कटर व इतर अवजारे जप्त करण्यात आली आहेत.
ऐन दिवाळीत फोडले होते एटीएम
ऐन दिवाळीत चिकोडी येथील एसबीआयचे एटीएम फोडून 23 लाख 48 हजार 800 रुपये पळविण्यात आले होते. तर अंकली येथील एटीएम फोडून 14 लाख 52 हजार 500 रुपये पळविण्यात आले होते. यमकनमर्डी येथील एटीएम मशीनमधून 57 हजार 200 रुपये रक्कम गुन्हेगारांनी पळविली होती. 8 नोव्हेंबर 2023 रोजी चिकोडी येथील घटना उघडकीस आली होती.
फरारी आरोपींचा शोध जारी
यासंबंधी भारत लाईव्ह न्यूज मीडियाने बिदरच्या जिल्हा पोलीस प्रमुख चन्नबसवण्णा एस. एल. यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाने बेळगाव जिल्ह्यात तीन एटीएम फोडल्याचे कबूल केल्याचे सांगितले. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून रक्कम पळविण्यात येत होती. आंतरराज्य टोळीतील या गुन्हेगारांपैकी काही जण अमली पदार्थांचे व्यवसायही करतात. फरारी आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.


Home महत्वाची बातमी एटीएम फोडणाऱ्या हरियाणातील त्रिकुटाला अटक
एटीएम फोडणाऱ्या हरियाणातील त्रिकुटाला अटक
बिदर पोलिसांची कारवाई : चिकोडी, अंकली, यमकनमर्डी येथील एटीएम फोडीची कबुली बेळगाव : बेळगावसह महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या तीन राज्यांत एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीतील त्रिकुटाचे बिदर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीतील आणखी चारजण फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. यमकनमर्डी, चिकोडी, अंकली येथे झालेल्या एटीएम फोडीची या त्रिकुटाने कबुली दिली आहे. तिनही […]