Solapur News | सोलापुरातील काँग्रेसभवनासमोर हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमितेला जोडेमार, भाजपने केला धिक्कार
सोलापूर काँग्रेसभवन पोलिस बंदोबस्ताखाली
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याशी केल्याने रविवारी दुपारी भाजपच्या वतीने सोलापुरातील काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सपकाळ यांच्या प्रतिमेस जोडे मारुन त्यांचा धिक्कार करण्यात आला.
यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या, टिपू सुलतान यांनी हिंदुची हत्या केली. त्यांची संपत्ती लुटली. महिलांची अब्रु लुटली. शपकाळ यांनी आधी इतिहास जाणून घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते व टिपु सुलतान कोण होते याचा इतिहास त्यांनी व्यवस्थित जाणून घ्यावा. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी
महाराज यांची तुलना भाजप कधीही सहन करणार नाही. सपकाळ यांनी तातडीने माफी मागावी अन्यथा त्यांना समक्ष जोडे मारण्यात येईल.
याप्रसंगी पोलिसांनी काँग्रेस भवनाचे गेट बंद करुन बंदोबस्त तैनात केला होता. याप -संगी भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी Solapur News | सोलापुरातील काँग्रेसभवनासमोर हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमितेला जोडेमार, भाजपने केला धिक्कार
Solapur News | सोलापुरातील काँग्रेसभवनासमोर हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमितेला जोडेमार, भाजपने केला धिक्कार
सोलापूर काँग्रेसभवन पोलिस बंदोबस्ताखाली सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याशी केल्याने रविवारी दुपारी भाजपच्या वतीने सोलापुरातील काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सपकाळ यांच्या प्रतिमेस जोडे मारुन त्यांचा धिक्कार करण्यात आला. यावेळी […]
