हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे अध्यक्ष
माजी आमदार आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र (maharashtra) काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला.18 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी या पदाची जबाबदारी नवीन अध्यक्षांकडे सोपवली. बिर्ला मातोश्री सभागृहात पदभार स्वीकारण्याचा समारंभ पार पडला. त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला आणि पत्रकार परिषदही घेतली.हर्षवर्धन सपकाळ हे राज्याच्या राजकारणात तुलनेने कमी प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व आहे. तसेच सोशल मीडियावरील अनेक कट्टर काँग्रेस समर्थकांनी निराशा व्यक्त केली कारण त्यांना एखाद्या अनुभवी नेत्याला ही जबाबदारी मिळण्याची अपेक्षा होती. काही लोकांनी तर या नियुक्तीवर जाहीर टीका केली आहे.येत्या काळात हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाची भूमिका पाहण्यासारखी ठरणार आहे. लोकसभा (lok sabha election) आणि विधानसभा (vidhan sabha election) निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला पराभव स्विकारावा लागला होता. येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कितपत प्रभावी ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.हेही वाचामुंबईत झोपू योजनेअंतर्गत म्हाडाला ‘इतकी’ घरे मिळणारबनावट तिकिटांच्या समस्येवर पश्चिम रेल्वेचा उपाय
Home महत्वाची बातमी हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे अध्यक्ष
हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे अध्यक्ष
माजी आमदार आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र (maharashtra) काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला.
18 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी या पदाची जबाबदारी नवीन अध्यक्षांकडे सोपवली. बिर्ला मातोश्री सभागृहात पदभार स्वीकारण्याचा समारंभ पार पडला. त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला आणि पत्रकार परिषदही घेतली.
हर्षवर्धन सपकाळ हे राज्याच्या राजकारणात तुलनेने कमी प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व आहे. तसेच सोशल मीडियावरील अनेक कट्टर काँग्रेस समर्थकांनी निराशा व्यक्त केली कारण त्यांना एखाद्या अनुभवी नेत्याला ही जबाबदारी मिळण्याची अपेक्षा होती. काही लोकांनी तर या नियुक्तीवर जाहीर टीका केली आहे.
येत्या काळात हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाची भूमिका पाहण्यासारखी ठरणार आहे. लोकसभा (lok sabha election) आणि विधानसभा (vidhan sabha election) निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला पराभव स्विकारावा लागला होता.
येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कितपत प्रभावी ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.हेही वाचा
मुंबईत झोपू योजनेअंतर्गत म्हाडाला ‘इतकी’ घरे मिळणार
बनावट तिकिटांच्या समस्येवर पश्चिम रेल्वेचा उपाय
