मराठीला नख लावल्यास गंभीर परिणाम
म. ए. समितीचा इशारा, हुतात्म्यांना अभिवादनासाठी मराठी भाषिक एकवटले
बेळगाव : मराठी भाषिक हे बेळगावचे मूळचे रहिवासी आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून येऊन स्थानिकांवर भाषेची बंधने लादू नयेत. कन्नड भाषिकांना त्यांच्या भाषेचा प्रचार व प्रसार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु, कन्नड सक्तीच्या माध्यमातून मराठीला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास याचे परिणाम गंभीर होतील, असा सूचक इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी दिला. म. ए. समितीच्यावतीने कन्नड सक्ती आंदोलनात स्वत:च्या जीवाचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना बुधवारी अभिवादन करण्यात आले. हुतात्मा चौक येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये पुढे बोलताना ते म्हणाले, हुतात्म्यांनी आपले रक्त सांडून सीमाप्रश्न आजवर धगधगता ठेवला आहे. एकजुटीने या प्रश्नाची सोडवणूक केल्यास निश्चितच यश येईल. हुतात्म्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत. परंतु, जर मराठीवरच अन्याय होत असेल तर गप्प राहून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. अॅड. राजाभाऊ पाटील, बी. ओ. येतोजी, रमाकांत कोंडुसकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर व रणजित चव्हाण-पाटील यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
यानंतर पारंपरिक मार्गाने मूकफेरी काढण्यात आली. रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, मारुती गल्ली, अनसूरकर गल्ली, किर्लोस्कर रोड मार्गे हुतात्मा चौक अशी मूकफेरी काढण्यात आली. अनसूरकर गल्ली येथे हौतात्म्य पत्करलेल्या मधु बांदेकर यांच्या प्रतिमेला माजी महापौर मधुश्री पुजारी, सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, शिवानी पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला किरण गावडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. किर्लोस्कर रोड येथील हुतात्मा महादेव बारागडी व लक्ष्मण गावडे यांच्या प्रतिमेला अॅड. महेश बिर्जे, नेताजी जाधव, चंद्रकांत गुंडकल, अॅड. वैभव कुट्रे यांनी अभिवादन केले. मदन बामणे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश द•ाrकर, रमेश करेण्णावर, पांडुरंग काटकर, राजू कणेरी, गजानन धामणेकर, महादेव पाटील, महादेव मंगणाकर, अंकुश केसरकर, धनराज गवळी, बंडू केरवाडकर, श्रीकांत कदम, राजू खन्नूरकर, प्रशांत भातकांडे, विजय भोसले, अॅड. अमर येळ्ळूरकर, महेश जुवेकर, मनोहर हलगेकर, महेश नाईक, दिनेश रावळ, सतीश पाटील, सागर पाटील, चंद्रकांत कोंडुसकर, शिवाजी हंगिरगेकर, आप्पासाहेब गुरव, पंढरी परब, श्रीकांत मांडेकर, प्रकाश शिरोळकर, किरण गावडे यासह मोठ्या संख्येने सीमावासीय उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी मराठीला नख लावल्यास गंभीर परिणाम
मराठीला नख लावल्यास गंभीर परिणाम
म. ए. समितीचा इशारा, हुतात्म्यांना अभिवादनासाठी मराठी भाषिक एकवटले बेळगाव : मराठी भाषिक हे बेळगावचे मूळचे रहिवासी आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून येऊन स्थानिकांवर भाषेची बंधने लादू नयेत. कन्नड भाषिकांना त्यांच्या भाषेचा प्रचार व प्रसार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु, कन्नड सक्तीच्या माध्यमातून मराठीला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास याचे परिणाम गंभीर होतील, असा सूचक इशारा महाराष्ट्र एकीकरण […]