हरमल गिरकरवाड्याचा न्यायालयात नव्याने पर्दाफाश

एकाच प्रभागात 187 नव्हे, तर तब्बल 217 बेकायदेशीर बांधकामे : बांधकामांमध्ये चालतात बेकायदेशीर रेस्टारंट्स, हॉटेल्स, गेस्ट हाऊस पणजी : हरमल किनारी भागांत असलेल्या गिरकरवाड्यावरील ‘विकास प्रतिबंधित’ क्षेत्रात (एनडीझेड) केवळ 187 बेकायदा बांधकामे नसून, प्रत्यक्षात जीसीझेडएमएने केलेल्या पाहणीत हा आकडा 217 असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हरमलमधील बेकायदा बांधकामांचा आणखी नव्याने पर्दाफाश झाला आहे. ही बांधकामे […]

हरमल गिरकरवाड्याचा न्यायालयात नव्याने पर्दाफाश

एकाच प्रभागात 187 नव्हे, तर तब्बल 217 बेकायदेशीर बांधकामे : बांधकामांमध्ये चालतात बेकायदेशीर रेस्टारंट्स, हॉटेल्स, गेस्ट हाऊस
पणजी : हरमल किनारी भागांत असलेल्या गिरकरवाड्यावरील ‘विकास प्रतिबंधित’ क्षेत्रात (एनडीझेड) केवळ 187 बेकायदा बांधकामे नसून, प्रत्यक्षात जीसीझेडएमएने केलेल्या पाहणीत हा आकडा 217 असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हरमलमधील बेकायदा बांधकामांचा आणखी नव्याने पर्दाफाश झाला आहे. ही बांधकामे उभारणाऱ्यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील कारवाई करा, असा आदेश काल बुधवारी जीसीझेडएमएला उच्च न्यायालयाने दिला आहे. हरमल येथील गिरकरवाडा या केवळ एकाच प्रभागात 187 बेकायदा रेस्टॉरंट्स, गेस्ट हाऊस आदींची बेकायदेशीर बांधकामे असल्याची माहिती तत्कालीन सरपंच बर्नार्ड फर्नांडिस याने 7 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली होती.
आकडा वाढतोय मारुतीच्या शेपटासारखा
मात्र बेकायदेशीर बांधकामांचा हा आकडा आता माऊतीच्या शेपटासारखा वाढतच आहे. जीसीझेडएमएने केलेल्या पाहणीचा अहवाल बुधवारी न्यायालयासमोर मांडण्यात आला, तेव्हा त्यात तब्बल 217 बेकायदेशीर बांधकामे असून त्यामध्ये बेकायदा रेस्टॉरंट्स, गेस्ट हाऊस आदीं व्यावसायिक आस्थापने चालत असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याची दखल घेऊन या सर्व बांधकामांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील कारवाई करा, असा आदेश उच्च न्यायालयाने जीसीझेडएमएला दिला आहे.
 … तर ती बांधकामे त्वरित सील करा
दरम्यान, हरमल पंचायतीने उच्च न्यायालयात काल बुधवारी आणखी एक अहवाल सादर केला. त्यामध्ये ‘कुठल्याही सरकारी खात्याची परवानगी न घेता 33 हंगामी बांधकामे उभारून व्यवसाय केले जात आहेत’, अशी माहिती पंचायतीने उच्च न्यायालयाला दिली. यावर न्यायालयाने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्याची पाहणी करून शहानिशा करायला सांगितले. तसेच त्यात तथ्य आढळल्यास ती बांधकामे त्वरित सील करण्याचाही आदेश दिला.
फर्नांडिस यांच्या अडचणींत भर
माजी सरपंच बर्नाड फर्नांडिस याचे कुटुंबीय, नातेवाईकांची बरीच बेकायदेशीर बांधकामे असल्याचे पुरावे खंडपीठाला मिळाले आहेत. या सर्व नातेवाईकांची  नक्की किती बांधकामे आहेत, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. दरम्यान, ही बांधकामे कसली आहेत, तेथे काय चालते या माहितीसह त्यांचा नकाशा सादर करण्याचा आदेश खंडपीठाने त्यांना दिला आहे.
बर्नाड फर्नांडिसला ‘कारणे दाखवा’ नोटीस
हरमलचे माजी सरपंच तथा पंच सदस्य बर्नार्ड फर्नाडिस यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा दुऊपयोग करून आपल्या कुटुंबीयाच्या बेकायदा बांधकामांना अभय दिल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार, पंचायत संचालनालयाने त्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. याप्रकरणी त्याला स्वत: हजर राहून 19 फेब्रुवारी रोजी बाजू मांडण्यास सांगितले आहे.