पाक संघात हॅरिस रौफचे पुनरागमन
वृत्तसंस्था /लाहोर
आयर्लंड आणि इंग्लंड यांच्या बरोबर होणाऱ्या आगामी टी-20 मालिकांसाठी पीसीबीच्या निवड समितीने गुरुवारी पाक संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये हॅरिस रौफचे पुनरागमन झाले असून फिरकी गोलंदाज उस्मा मीरला वगळण्यात आले आहे. आयर्लंड आणि पाक यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 10 मेपासून खेळविली जाणार आहे. त्यानंतर पाकचा संघ इंग्लंडमध्ये मालिका खेळण्यासाठी दाखल होणार आहे. पाक आणि इंग्लंड यांच्यातील 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेला 22 मेपासून प्रारंभ होईल. बाबर आझमकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
पाक संघ : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, आझम खान, सईम अयुब, फक्र जमान, इफ्तिकार अहमद, इरफान खान नियाजी, अब्रार अहमद, हसन अली, हॅरिस रौफ, शाहिन आफ्रिदी, मोहम्मद अमिर, इमाद वासिम, नशिम शाहा, शदाफ खान, उस्मान खान, अब्बास अफ्रिदी आणि आगा अली सलमान.
Home महत्वाची बातमी पाक संघात हॅरिस रौफचे पुनरागमन
पाक संघात हॅरिस रौफचे पुनरागमन
वृत्तसंस्था /लाहोर आयर्लंड आणि इंग्लंड यांच्या बरोबर होणाऱ्या आगामी टी-20 मालिकांसाठी पीसीबीच्या निवड समितीने गुरुवारी पाक संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये हॅरिस रौफचे पुनरागमन झाले असून फिरकी गोलंदाज उस्मा मीरला वगळण्यात आले आहे. आयर्लंड आणि पाक यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 10 मेपासून खेळविली जाणार आहे. त्यानंतर पाकचा संघ इंग्लंडमध्ये मालिका खेळण्यासाठी दाखल होणार […]