केसरी नंदन हनुमानजींसाठी नैवेद्यात बनवा केशरी खीर
साहित्य-
फुल क्रीम दूध – एक लिटर
बासमती तांदूळ – १/४ कप
साखर – अर्धा कप
केशर – एक चिमूटभर
वेलची पूड – अर्धा टीस्पून
देसी तूप – एक टीस्पून
बदाम
काजू
मनुके
ALSO READ: मारुतीला गोड रसरशीत बुंदी आणि इमरती स्वत:च्या हाताने तयार करुन अर्पण करा
कृती-
सर्वात आधी एका मोठया भांड्यात दूध उकळवा. दूध उकळू लागले की त्यात साधारण पंधरा मिनिट आधी भिजवलेले तांदूळ घाला आणि मंद आचेवर शिजवा. तांदूळ मऊ होईपर्यंत आणि दूध घट्ट होईपर्यंत शिजवा. आता गरम दुधात भिजवलेले केशरयुक्त दूध आणि साखर घाला आणि चांगले मिसळा. मग तुपात भाजलेले सुके मेवे घाला आणि वेलची पूड देखील घाला. खीर मंद आचेवर आणखी पाच मिनिटे शिजू द्या.
तयार केलेल्या केशराच्या खीरमध्ये तुळशीची पाने घाला. तर चला तयार आहे आपली केशरी खीर रेसिपी, हनुमानजींना नक्कीच नैवेद्य दाखवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
