हिंडलगा येथे शिवरायांचा जयजयकार
चंदगड तालुक्यातील गंधर्व गडावरून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत
वार्ताहर /हिंडलगा
येथील रामदेव गल्लीतील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर गुऊवार दि. 9 रोजी पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. .प्रथम गावच्या प्रवेशद्वारात चंदगड तालुक्यातील गंधर्व गडावरून आणण्यात आलेल्या शिवज्योतीचे स्वागत ग्रामस्थांनी केले. ही शिवज्योत परशराम कुडचीकर, महेश जगताप, मयूर अतिवाडकर, किशोर कडोलकर, कौशिक मुतकेकर या मावळ्यांनी आणली होती. येथील स्वागतानंतर ही ज्योत गावातील मांजरेकरनगर, महादेव गल्ली, हायस्कूल रोड, नवीन वसाहत, लक्ष्मी गल्ली, मरगाई गल्लीतून फिरवून रामदेव गल्लीत आली. गावातून फिरताना गावातील लक्ष्मी मंदिर, कलमेश्वर मंदिर, माऊती मंदिर, विठ्ठल मंदिर येथे पूजा करण्यात आली. रामदेव गल्लीतील श्रीराम मंदिरात या ज्योतीचे गल्लीतील महिलांनी स्वागत केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. येथील महिलांनी आरती म्हणून शिवभक्तांचे स्वागत केले. उपस्थित शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करून परिसर दणाणून सोडला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून पारंपरिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. येथील रेणुका जगताप, आशा मुतकेकर, चंदा किल्लेकर व इतर कार्यकर्त्यांनी शिवजयंती कार्यक्रमात सहभाग दर्शवला.
Home महत्वाची बातमी हिंडलगा येथे शिवरायांचा जयजयकार
हिंडलगा येथे शिवरायांचा जयजयकार
चंदगड तालुक्यातील गंधर्व गडावरून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत वार्ताहर /हिंडलगा येथील रामदेव गल्लीतील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर गुऊवार दि. 9 रोजी पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. .प्रथम गावच्या प्रवेशद्वारात चंदगड तालुक्यातील गंधर्व गडावरून आणण्यात आलेल्या शिवज्योतीचे स्वागत ग्रामस्थांनी केले. ही शिवज्योत परशराम कुडचीकर, महेश जगताप, मयूर अतिवाडकर, किशोर कडोलकर, कौशिक मुतकेकर या मावळ्यांनी […]