मोठी बातमी, सलमान खानच्या वांद्रेतील घराबाहेर गोळीबार
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग करण्यात आली आहे. सलमान खान वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. येथे 2 अज्ञातांनी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 4 राऊंड फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला मारण्याची धमकी दिली होती. बिष्णोई गॅंगकडून त्याला वेळोवेळी धमकी देण्यात आली आहे. यानंतर मुंबई पोलिसांकडून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानसोबत नेहमी पोलिस आणि सुरक्षा रक्षकांचा ताफा असतो.पोलिसांकडून 2 अज्ञातांचा शोध घेतला जातोय. सलमानच्या घराजवळीस सीसीटीव्ही तपासले जात आहेत. 2 अज्ञात हेल्मेट घालून दुचाकीवर गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ दाखल झाले होते. दरम्यान क्राइम ब्रांचची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
Home महत्वाची बातमी मोठी बातमी, सलमान खानच्या वांद्रेतील घराबाहेर गोळीबार
मोठी बातमी, सलमान खानच्या वांद्रेतील घराबाहेर गोळीबार
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग करण्यात आली आहे. सलमान खान वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. येथे 2 अज्ञातांनी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 4 राऊंड फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे.
लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला मारण्याची धमकी दिली होती. बिष्णोई गॅंगकडून त्याला वेळोवेळी धमकी देण्यात आली आहे. यानंतर मुंबई पोलिसांकडून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानसोबत नेहमी पोलिस आणि सुरक्षा रक्षकांचा ताफा असतो.
पोलिसांकडून 2 अज्ञातांचा शोध घेतला जातोय. सलमानच्या घराजवळीस सीसीटीव्ही तपासले जात आहेत. 2 अज्ञात हेल्मेट घालून दुचाकीवर गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ दाखल झाले होते. दरम्यान क्राइम ब्रांचची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
