गुंजेनहट्टी यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

वार्ताहर /कडोली भाविकांची अलोट गर्दी आणि अमाप उत्साहात गुंजेनहट्टी येथील श्री होळी कामाण्णा यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. मंगळवारीही भाविकांची उपस्थिती लक्षणीय राहणार आहे. सालाबादप्रमाणे धूलिवंदनानिमित्त आयोजित केलेल्या श्री होळी कामाण्णा देवालयाच्या यात्रोत्सवाला कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून आपला नवस फेडला. सकाळी होळी चढविण्यात आल्यानंतर देवाला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर देवस्थान पंच […]

गुंजेनहट्टी यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

वार्ताहर /कडोली
भाविकांची अलोट गर्दी आणि अमाप उत्साहात गुंजेनहट्टी येथील श्री होळी कामाण्णा यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. मंगळवारीही भाविकांची उपस्थिती लक्षणीय राहणार आहे. सालाबादप्रमाणे धूलिवंदनानिमित्त आयोजित केलेल्या श्री होळी कामाण्णा देवालयाच्या यात्रोत्सवाला कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून आपला नवस फेडला. सकाळी होळी चढविण्यात आल्यानंतर देवाला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर देवस्थान पंच कमिटी आणि पुजारी यांच्या हस्ते गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर भर यात्रेला सुरुवात झाली. यात्रा कमिटीने योग्य नियोजन केल्याने यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पडण्यास मदत झाली. यात्रा परिसरात पाणी, वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यात आला. नियोजनानुसार कडोली, देवगिरी आणि केदनूर गावांजवळ पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. दुचाकी वगळता इतर कोणत्याही वाहनांना जवळपास एक कि.मी. परिसरात प्रवेश दिला नाही. त्यामुळे भाविकांना रहदारीला त्रास झाला नाही. यात्रा काळात अनुचित घटना घडू नये यासाठी काकती पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश एम. आणि उपनिरीक्षक रवी व्ही. तसेच सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला आहे. श्री होळी कामाण्णा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून यात्रा परिसरात खेळण्यांची दुकाने, पाळणे व इतर दुकाने मोठ्या संख्येने स्थापण्यात आल्याने परिसर फुलून गेला आहे. मंगळवारीही यात्रेला भाविकांची उपस्थिती लक्षणीय राहणार असून या दिवशी योग्य खबरदारी घेतली जाणार आहे. कडोली ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीने पाण्याची सोय करून दिल्याने भाविकांत समाधान व्यक्त होत आहे.