UPW vs GG: गुजरात जायंट्सने UP वॉरियर्सचा 81 धावांनी पराभव केला
UPW vs GG: बेथ मुनीच्या शानदार फलंदाजीनंतर काशवी गौतम आणि तनुजा कंवर यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे गुजरात जायंट्सने महिला प्रीमियर लीग (WPL) सामन्यात यूपी वॉरियर्सचा 81धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या स्पर्धेच्या इतिहासात धावांच्या बाबतीत कोणत्याही संघाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. बेथ मुनीच्या 96 धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरात जायंट्सने 20 षटकांत पाच गडी गमावून 186धावा केल्या.
ALSO READ: केरळला हरवून विदर्भाने जिंकले रणजी ट्रॉफीचे विजेतेपद
प्रत्युत्तरात, यूपी वॉरियर्सचा संघ 17.1 षटकात 105 धावांवर सर्वबाद झाला.यूपी वॉरियर्सकडून चिनेल हेन्रीने सर्वाधिक 28 धावा केल्या, तर सलामीवीर ग्रेस हॅरिसने 25 धावा केल्या.यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्याच षटकात त्यांनी एक विकेट गमावली.
ALSO READ: RCB vs DC: दिल्लीचा नऊ विकेट्सनी विजय, आरसीबीचा घरच्या मैदानावर सलग चौथा पराभव
चिनेल हेन्रीने हेमलताला बाद करून गुजरातला पहिला धक्का दिला. तीन चेंडूत दोन धावा काढून हेमलता बाद झाली. पहिल्याच षटकात हेमलताला बाद करून उत्तर प्रदेशने सुरुवातीलाच धक्का दिला पण मुनी आणि हरलीन देओल यांनी गुजरातचा डाव सांभाळला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली जी एक्लेस्टोनने मोडली. मुनीने 59चेंडूत 17चौकारांसह नाबाद 96 धावा केल्या
गुजरातकडून डिआंड्रा डॉटिनने 17, कर्णधार अॅशले गार्डनरने 11 फोबी लिचफिल्डने आठ आणि दयालन हेमलता यांनी दोन धावा केल्या. त्याच वेळी, भारती फुलमाळी दोन धावा करून नाबाद राहिली. उत्तर प्रदेशकडून सोफी एक्लेटनने दोन, तर चिनेल हेन्री, दीप्ती शर्मा आणि क्रांती गौरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
Edited By – Priya Dixit
ALSO READ: DC W VS GG W : दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा सहा विकेट्सने पराभव केला