रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी दिशानिर्देश

केंद्र सरकारने उचलले पाऊल : राज्यांना करावी लागणार पाहणी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली उन्हाळ्यात रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या घटना रोखण्याच्या उपाययोजनांवरून केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) सर्व राज्यांना दिशानिर्देश जारी केले आहेत. राज्यांना स्वत:च्या अधिकारक्षेत्रात यणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये पाहणी करावी लागेल आणि रुग्णालयांमध्ये विजेच्या मीटरवर विशेष देखरेख ठेवावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र […]

रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी दिशानिर्देश

केंद्र सरकारने उचलले पाऊल : राज्यांना करावी लागणार पाहणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उन्हाळ्यात रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या घटना रोखण्याच्या उपाययोजनांवरून केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) सर्व राज्यांना दिशानिर्देश जारी केले आहेत. राज्यांना स्वत:च्या अधिकारक्षेत्रात यणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये पाहणी करावी लागेल आणि रुग्णालयांमध्ये विजेच्या मीटरवर विशेष देखरेख ठेवावी लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशावर आरोग्य मंत्रालयाने हे दिशानिर्देश जारी केले आहेत. तसेच सर्व राज्यांना या सल्ल्याच्या आधारावर आवश्यक पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे. नॅशनल बिल्डिंग कोड 2016 मध्ये अग्निसुरक्षा मापदंड लागू करण्यासाठी रुग्णालयांमधील उपाययोजनांची नियमित समीक्षा केली जावी असे नमूद आहे. फायर सेफ्टी ऑडिटवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. हवा खेळती राहण्यासाठी योग्य प्रणाली, आग प्रतिबंधक दरवाजे आणि कॉरिडॉरमध्ये आपत्कालीन प्रकाश व्यवस्था आणि जिने सुनिश्चित करणे सामील आहे.
उन्हाळ्यात तापमान वाढण्यासोबत रुग्णालयात आग लागण्याचा मोठा धोका निर्माण होत असतो. रुग्णालयांमध्ये आगीपासून बचावासाठी सर्व आवश्यक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी संपूर्ण फायर सेफ्टी ऑडिट करणे आवश्यक आहे. याकरता ऑन-साइट इन्स्पेक्शन करण्यासह फायर अलार्म, फायर स्मोक डिटेक्टर, फायर एक्सटिंगुइशर, फायर हायड्रेंड आणि फायर लिफ्टसोबत अग्निशमन प्रणाली उपलब्ध आहे का आणि पूर्णपणे कार्य करतेय की नाही हे पहावे लागणार आहे. वीज भार ऑडिटही केले जावे. विशेषकरून नवी उपकरणे जोडताना किंवा रिकामी जागांना आयसीयूमध्ये बदलताना ही उपाययोजना अंमलात आणली जावी असे दिशानिर्देशात म्हटले गेले आहे.
आगीपासून बचावासाठी असलेल्या नियमांचे पूर्णपणे पालन केले जावे. फायर एनओसी नियम आवश्यक असून एखाद्या रुग्णालयाकडे फायर एनओसी नसल्यास राज्यांनी कठोर पावले उचलावीत. रुग्णालयांनी अग्निशामक यंत्र, हायड्रेंट आणि अलार्म यासारख्या अग्निशमन उपकरणांचे निरीक्षण करावे. हायड्रेंड पोहोचण्यायोग्य आहे का आणि त्यात पुरेसा पाण्याचा दबाव आहे का हे पाहिले जावे. फायर अलर्मा पूर्ण स्थानी चालू स्थितीत आहे का हे पाहण्याचा दिशानिर्देश देण्यात आला आहे.