वनजमिनीवरील दाव्याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन

200 अर्जांची छाननी : आवश्यक कागदपत्रांची दुरुस्ती खानापूर : खानापुरात वनक्षेत्रात येणाऱ्या विविध गावांतील अनुसुचित जाती, जमाती व अन्य वननिवासी लोकांना अरण्य हक्क व वनजमिनी मिळवून देण्यासाठी खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून वनहक्क समितीतर्फे दि. 17 जून रोजी संपत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर येथील शिवस्मारकात आयोजित […]

वनजमिनीवरील दाव्याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन

200 अर्जांची छाननी : आवश्यक कागदपत्रांची दुरुस्ती
खानापूर : खानापुरात वनक्षेत्रात येणाऱ्या विविध गावांतील अनुसुचित जाती, जमाती व अन्य वननिवासी लोकांना अरण्य हक्क व वनजमिनी मिळवून देण्यासाठी खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून वनहक्क समितीतर्फे दि. 17 जून रोजी संपत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर येथील शिवस्मारकात आयोजित करण्यात आले होते. अभिजीत सरदेसाई यांनी प्रास्ताविक करून शिबिराचा उद्देश सांगितला. प्रा. अविनाश भाले व अजित देसाई यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मागील शिबिरात वनहक्कांसाठीच्या दाव्यांचे अर्ज तयार करण्यासाठी लोकांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शेतकऱ्यांचे विहित नमुन्यातील 200 अर्जांची छाननी करण्यात आली व इतर अर्जांत कांही त्रुटी आढळून आल्याने त्या दुरुस्त करण्यात आल्या. शिबिराचे निमंत्रक महादेव मरगाळे यांनी उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. व दाव्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये जमिनीचे नकाशे, फोटो इ. योग्य पद्धतीने जोडले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी म्हणून सूचना केली. संपत देसाई यांनी उपस्थितांना दाव्यांचे अर्ज का परिपूर्ण असणे गरजेचे आहे, हे विशद केले. खाचू कुलम व प्रकाश गुरव यांनी आभार मानले. शिबिराला तळावडे, डोंगरगाव, अबनाळी आदी गावांतून बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.