मे महिन्यात जीएसटी महसुलात किंचित घट
पणजी : राज्याच्या जीएसटी महसुलात यंदा मे महिन्यात घट नोंदविण्यात आली आहे. तत्पूर्वीच्या एप्रिल महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीत 765 कोटींची भर पडली होती. यंदा मे महिन्यात 519 कोटी ऊपये जीएसटी महसूल जमा झाला आहे. गतवर्षीच्या याच कालावधीत तो 523 कोटी ऊपये प्राप्त झाला होता.अर्थातच ही घट नाममात्र म्हणजे 1 टक्का एवढीच असल्याचे केंद्रीय मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून आले आहे. मे महिन्यात देशाचा जीएसटी महसूल 1.73 लाख कोटी रूपये आहे. गत वर्षीच्या त्याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ 10 टक्के एवढी आहे. देशाचा जीएसटी महसूल वाढला असला तरी राज्याचा महसूल 1 टक्क्याने कमी झाला आहे. गोव्यासह चंदीगड, सिक्किम, अरूणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा, मेघालय, लक्षद्वीप, लडाख या प्रदेशांच्याही जीएसटी महसुलात घट नोंदविण्यात आली आहे. याऊलट महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या जीएसटी महसुलात मात्र अनुक्रमे 14 आणि 15 टक्क्यांनी वाढ नोंद झाली आहे.
Home महत्वाची बातमी मे महिन्यात जीएसटी महसुलात किंचित घट
मे महिन्यात जीएसटी महसुलात किंचित घट
पणजी : राज्याच्या जीएसटी महसुलात यंदा मे महिन्यात घट नोंदविण्यात आली आहे. तत्पूर्वीच्या एप्रिल महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीत 765 कोटींची भर पडली होती. यंदा मे महिन्यात 519 कोटी ऊपये जीएसटी महसूल जमा झाला आहे. गतवर्षीच्या याच कालावधीत तो 523 कोटी ऊपये प्राप्त झाला होता.अर्थातच ही घट नाममात्र म्हणजे 1 टक्का एवढीच असल्याचे केंद्रीय मंत्रालयाने […]