फेब्रुवारीत जीएसटी संकलन घसघशीत

1.68 लाख कोटी रुपयांची करकमाई : गेल्या फेब्रुवारीपेक्षा साडेबारा टक्के जास्त वृत्तसंस्था / नवी दिल्ली वस्तू-सेवा कराचे (जीएसटी) संकलन फेब्रुवारी महिन्यात 1.68 लाख कोटी इतके झाले आहे. ते गेल्यावर्षीच्या फेब्रुवारीपेक्षा 12.5 टक्के अधिक आहे. फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असूनही करसंकलन अत्यंत समाधानकारक प्रमाणात झाले आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या करविभागाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत सध्याच्या […]

फेब्रुवारीत जीएसटी संकलन घसघशीत

1.68 लाख कोटी रुपयांची करकमाई : गेल्या फेब्रुवारीपेक्षा साडेबारा टक्के जास्त
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वस्तू-सेवा कराचे (जीएसटी) संकलन फेब्रुवारी महिन्यात 1.68 लाख कोटी इतके झाले आहे. ते गेल्यावर्षीच्या फेब्रुवारीपेक्षा 12.5 टक्के अधिक आहे. फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असूनही करसंकलन अत्यंत समाधानकारक प्रमाणात झाले आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या करविभागाकडून देण्यात आली आहे.
आतापर्यंत सध्याच्या आर्थिक वर्षाचे 11 महिने पूर्ण झाले आहेत. या कालावधीत वस्तू-सेवा कराचे प्रतिमाह सरासरी संकलन 1.67 लाख कोटी इतके झाले आहे. मार्च महिन्यातही साधारणत: हीच पातळी गाठली जाईल, अशी शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात प्रतिमास सरासरी संकलन 1.50 लाख कोटी रुपयांचे होते. त्यात वाढ होऊन या आर्थिक वर्षात ते सरासरी 1.67 लाख कोटी इतके झाले आहे. फेब्रुवारीत देशांतर्गत व्यवहारांमधून होणाऱ्या संकलनात 13.9 टक्के वाढ झाली आहे. तर आयातीतून होणाऱ्या करसंकलनात 8.5 टक्के वाढ होणार आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये एकंदर वस्तू-सेवा करसंकलन 1 लाख 68 हजार 337 कोटी रुपये इतके झाले आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
परताव्यातही वाढ
फेब्रुवारी महिन्यात वस्तू-सेवा कर परताव्यातही वाढ झाली असून तो 1.51 लाख कोटी इतका आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत ही वाढ 13.6 टक्के आहे. फेब्रुवारी 2024 मधील संकलन जमेस धरुन या आर्थिक वर्षात आतापर्यंत 18 लाख 40 हजार कोटी रुपयांचे करसंकलन झाले, अशी माहिती देण्यात आली.