कोणत्याही परिस्थितीत गृहलक्ष्मी योजना थांबविली जाणार नाही

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्पष्टीकरण  बेळगाव : आज किंवा उद्या गृहलक्ष्मी योजनेतील निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना दिली. राज्य सरकारकडून जारी केलेल्या पाच गॅरंटी योजना कोणत्याही परिस्थितीत थांबविल्या जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. भाजप नेत्यांना कोणतेही काम नसल्यामुळे नको ते आरोप करत आहेत. सत्ता […]

कोणत्याही परिस्थितीत गृहलक्ष्मी योजना थांबविली जाणार नाही

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्पष्टीकरण 
बेळगाव : आज किंवा उद्या गृहलक्ष्मी योजनेतील निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना दिली. राज्य सरकारकडून जारी केलेल्या पाच गॅरंटी योजना कोणत्याही परिस्थितीत थांबविल्या जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. भाजप नेत्यांना कोणतेही काम नसल्यामुळे नको ते आरोप करत आहेत. सत्ता असताना चाळीस टक्के कमिशन घेऊन घरी बसले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. दि. 1 मे रोजी गृहलक्ष्मी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना निधी वर्ग करण्यात आला होता. आता जून महिन्याचा निधी लवकरच वर्ग केला जाणार असून आज किंवा उद्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल. राज्यात काँग्रेस सरकार पाच वर्षे सत्तेत असणार असून योजना बंद होईल अशी भीती कुणीही बाळगू नये. वचन दिल्याप्रमाणे प्रत्येकाला या योजनेचा लाभ करून दिला जाईल. असे सांगत कोणीही काहीही सांगितले तरी त्याकडे लक्ष देऊ नये. कोणत्याही परिस्थितीत योजना राबविली जाणार असल्याचे स्पष्टीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले आहे.