Satara News : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हळदीच्या अंगाने घोड्यावरून नवरदेव मतदान केंद्रावर

                             नवरदेवने मतदानाला प्राधान्य दिले सातारा : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज तालुक्यातील मतदान केंद्रांवर दिवसभर उत्साहात मतदान सुरू आहे. कराड तालुक्यातील भैरवनाथनगर येथील युवा उद्योजक ऋतुराज भालचंद्र थोरात यांचा आज विवाह पार पडत होता. विवाहाच्या गडबडीमध्येही लोकशाहीबद्दलच्या जबाबदारीला […]

Satara News : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हळदीच्या अंगाने घोड्यावरून नवरदेव मतदान केंद्रावर

                             नवरदेवने मतदानाला प्राधान्य दिले
सातारा : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज तालुक्यातील मतदान केंद्रांवर दिवसभर उत्साहात मतदान सुरू आहे. कराड तालुक्यातील भैरवनाथनगर येथील युवा उद्योजक ऋतुराज भालचंद्र थोरात यांचा आज विवाह पार पडत होता.
विवाहाच्या गडबडीमध्येही लोकशाहीबद्दलच्या जबाबदारीला प्राधान्य देत, हळदीसाठी तयार झाल्यानंतर नवरदेव घोड्यावरून थेट भैरवनाथनगर मतदान केंद्रावर पोहोचला आणि आपला मतदानाचा हक्क बजावला.
नवरदेवने सांगितले, “जितके लग्न महत्वाचे आहे, तितकंच मतदानही महत्वाचे आहे. त्यामुळे मी मतदान केले.” या कृतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मतदानाबाबत प्रेरणा निर्माण झाली असून, तरुण मतदारांमध्ये जागरूकता वाढत आहे.
मतदान केंद्रावर प्रशासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या आणि मतदान शांततेत सुरळीत पार पडत आहे. नागरिकांनीही सकाळपासून उत्साहाने आपला हक्क बजावला आहे.