बोडकेनट्टीत किराणा दुकानदाराचा खून
पाण्याची बाटली-सिगारेटचे पैसे मागितल्याने वादावादीतून घडला प्रकार
बेळगाव : पाण्याची बाटली व सिगारेटचे पैसे मागितल्याने किराणा दुकानदाराचा खून करण्यात आला आहे. मंगळवारी मध्यरात्री बोडकेनट्टी बसथांब्याजवळ ही घटना घडली असून दड्डी मोहनगा यात्रा आटोपून गावी परतणाऱ्या कडोली येथील चार तरुणांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. यासंबंधी काकती पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यल्लाप्पा दुर्गाप्पा नाईक (वय 48) राहणार बोडकेनट्टी असे खून झालेल्या दुर्दैवी दुकानदाराचे नाव आहे. यासंबंधी यल्लाप्पाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीधर पाटील (वय 26), निखिल चौगुले (वय 27), विवेक चौगुले (वय 22) या तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात घटनास्थळी चौघे जण होते, अशी माहिती मिळाली असून आणखी एका तरुणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. कडोली येथील चार तरुण मंगळवारी मध्यरात्री दड्डी-मोहनगा यात्रेवरून गावी परतत होते. हे सर्वजण बोडकेनट्टी बसथांब्याजवळ थांबले.
त्यावेळी यल्लाप्पाचे किराणा व चहाचे दुकान उघडे होते. पाण्याच्या बाटल्या व सिगारेट खरेदी केले. थोडावेळ सर्वजण धूम्रपान करीत तेथेच थांबले. आपण दुकान बंद करणार आहोत, पाणी व सिगारेटचे पैसे द्या, असे दुकानदाराने सांगितले. दुकानदाराने पैसे मागताच त्याच्याशी हुज्जत घालत वादावादी सुरू केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण करण्यात आली. वर्मी मार बसल्याने दुकानदार यल्लाप्पा अत्यवस्थ झाला. त्याला बेळगाव येथील खासगी इस्पितळात हलविताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम., काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी, उपनिरीक्षक मंजुनाथ नायक आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत. यासंबंधी चौघांना ताब्यात घेतले आहे. एफआयआरमध्ये तिघांची नावे आहेत. चौथ्या तरुणाची चौकशी करण्यात येत आहे.
Home महत्वाची बातमी बोडकेनट्टीत किराणा दुकानदाराचा खून
बोडकेनट्टीत किराणा दुकानदाराचा खून
पाण्याची बाटली-सिगारेटचे पैसे मागितल्याने वादावादीतून घडला प्रकार बेळगाव : पाण्याची बाटली व सिगारेटचे पैसे मागितल्याने किराणा दुकानदाराचा खून करण्यात आला आहे. मंगळवारी मध्यरात्री बोडकेनट्टी बसथांब्याजवळ ही घटना घडली असून दड्डी मोहनगा यात्रा आटोपून गावी परतणाऱ्या कडोली येथील चार तरुणांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. यासंबंधी काकती पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यल्लाप्पा दुर्गाप्पा नाईक (वय 48) राहणार बोडकेनट्टी असे […]


