विश्वजित राणेंकडून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षे पूर्ण केल्याबद्दल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी त्यांच्या पणजीतील शासकीय बंगल्यावर जाऊन पुष्पगुच्छासहीत आपल्या शुभेच्छा दिल्या. डॉ. प्रमोद सावंत यांची गेल्या 5 वर्षातील अत्यंत त्यागपूर्व अशी सेवा आहे. गोव्याच्या विकासामध्ये त्यांनी जी भर घातलेली आहे ती अभूतपूर्व आणि लक्षवेधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची […]

विश्वजित राणेंकडून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षे पूर्ण केल्याबद्दल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी त्यांच्या पणजीतील शासकीय बंगल्यावर जाऊन पुष्पगुच्छासहीत आपल्या शुभेच्छा दिल्या. डॉ. प्रमोद सावंत यांची गेल्या 5 वर्षातील अत्यंत त्यागपूर्व अशी सेवा आहे. गोव्याच्या विकासामध्ये त्यांनी जी भर घातलेली आहे ती अभूतपूर्व आणि लक्षवेधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची अशाच पद्धतीने विकास घोडदौड चालू राहुद्या. डॉ. प्रमोद सावंत यांच्या कारकिर्दीत गोव्याचा सर्वांगीण विकास आणि भरभराट झालेली आहे, असे विश्वजित राणे यांनी समाजमाध्यमातून आपले मत व्यक्त केले आणि डॉ. प्रमोद सावंत यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.