एमसीसी, सिग्नेचर एससी संघांचे शानदार विजय

एनडी वॉरियर्स टी-20 क्रिकेट स्पर्धा बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित एनडी वॉरियर्स टी-20 निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या सामन्यातील एमसीसी संघाने गोकाक संघाचा 6 गड्यांनी तर सिग्नेचर स्पोर्टस् संघाने टिळकवाडी क्लबचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. राहुल बजंत्री (सिग्नेचर), सालिक पटवेगार (एमसीसी) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भगवान महावीर मैदानावरती खेळविण्यात आलेल्या […]

एमसीसी, सिग्नेचर एससी संघांचे शानदार विजय

एनडी वॉरियर्स टी-20 क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित एनडी वॉरियर्स टी-20 निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या सामन्यातील एमसीसी संघाने गोकाक संघाचा 6 गड्यांनी तर सिग्नेचर स्पोर्टस् संघाने टिळकवाडी क्लबचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. राहुल बजंत्री (सिग्नेचर), सालिक पटवेगार (एमसीसी) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भगवान महावीर मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात टिळकवाडी क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्वगडी बाद 119 धावा केल्या. त्यात रोहित दोडवाडने 1 षटकार 2 चौकारसह 26, ओमकार चव्हाणने तर रवी पिल्लेने 15 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे अमोल यलूपाचेने 20 धावात 3 तर राहुल बजंत्रीने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सिग्नेचर स्पोर्टस् क्लबने 15.2 षटकात 3 गडी बाद 124 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात रारुल बजंत्रीने 1 षटकार 7 चौकारांसह 56, विशाल बेडकाने 4 चौकारांसह 41 तर रामनाथ काळेने 13 धावा केल्या. टिळकवाडीतर्फे मल्लाप्पाने 2 तर ओमकारने 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात गोकाकने प्रथम फलंदाजी करताना 15.5 षटकात सर्वगडी बाद 75 धावा केल्या. त्यात चेतन तलवारने 20 अपूर्ण सुतारने 14 धावा केल्या. एमसीसीतर्फे सालिक पटवेगारने 11 धावात 3 तर प्रेम इंगळेने 11 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसीने 10.3 षटकात 4 गडी बाद 77 धावा करून सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात सालिक पटवेगारने 7 चौकारांसह 34, सर्फराज शेखने 19 धावा केल्या. गोकाकतर्फे खलीलने 2, रोहितने 1 गडी बाद केला.