खानापुरात उद्या भव्य कुस्ती मैदान

बेळगाव : खानापुर तालुका कुस्तीगीर संघटना आयोजित अखिल भारतीय पातळीवरील भव्य कुस्ती मैदान बुधवार दि. 29 रोजी मलप्रभा क्रीडांगण जांबोटी रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. या मैदानाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून कुस्ती शौकीनांना बसण्यासाठी गॅलरीची सोय करण्यात आली आहे. या मैदानात प्रमुख कुस्ती भारत केसरी व हेंद केसरी दिनेश गुलीया हरियाना व […]

खानापुरात उद्या भव्य कुस्ती मैदान

बेळगाव : खानापुर तालुका कुस्तीगीर संघटना आयोजित अखिल भारतीय पातळीवरील भव्य कुस्ती मैदान बुधवार दि. 29 रोजी मलप्रभा क्रीडांगण जांबोटी रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. या मैदानाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून कुस्ती शौकीनांना बसण्यासाठी गॅलरीची सोय करण्यात आली आहे. या मैदानात प्रमुख कुस्ती भारत केसरी व हेंद केसरी दिनेश गुलीया हरियाना व महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर नाशिक, दुसऱ्या क्रमांकाची लढत उपमहाराष्ट्र केसरी संदीप पोटे, भारत केसरी रॉबीन हुड्डा यांच्यात तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे दावणागेरी व पंजाब केसरी सुमीतसिंग पंजाब यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती राष्ट्रीय चॅम्पियन प्रतिक जज्जर हरियाना व कर्नाटक केसरी संगमेश बिरादार, चौथ्या क्रमांकाची कुस्ती शिवानंद दड्डी व उदयकुमार टायसन मोतीबाग, सहाव्या क्रमांकाची कुस्ती प्रकाश इंगळगी व प्रणव यादव मोतीबाग, सातव्या क्रमांकाची कुस्ती दया बनकर कोल्हापूर व किर्तीकुमार कार्वे, आठव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी व शुभम सांगली, नव्या क्रमांकाची कुस्ती कृष्णा सावंत सातरा व पवन चिकद्दीनकोप, दहाव्या क्रमांकाची कुस्ती रोहित कंग्राळी व बसु जगदाळे यांच्यात होणार आहे. याशिवाय 70 हून अधिक लहान-मोठ्या कुस्त्या होणार आहेत. मेंड्याची कुस्ती गणेश सरवणकर व महेश तिर्थकुंडे यांच्यात होणार आहे. महिला कुस्ती ऋतुजा गुरव, गणेबैल व राधिका संतीबस्तवाड यांच्यात होणार आहेत. या कुस्तीसाठी आम. विठ्ठल हलगेकर, विश्वेश्वरय्या हेगडे-कागेरी, माजी आमदार अरविंद पाटील, नाशिर बागवान यांच्या सहयोगाने या कुस्तीचे आयोजन करण्यात आले. कुस्ती मैदान दुपारी 2 वा सुरू करण्यात येणार असून पावसामुळे मैदान लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कुस्ती शौकीनांनी तसेच मल्लांनी सहकार्य करावे असे आवाहन कुस्ती संयोजक हणमंत गुरव यांनी केले आहे.