खासदार मंडलिकांच्या प्रचारार्थ महिलांची भव्य दूचाकी रॅली

कोल्हापूर प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या महिला आघाडीच्यावतीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील प्रमुख मार्गावरुन भव्य दूचाकी रॅली काढण्यात आली. गांधी मैदान येथून रॅलीस सुरुवात झाली. पुढे खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदीर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, सीपीआर चौक, दसरा चौक, बिंदू चौक, उमा टॉकीज्, बागल चौक, राजारामपुरी जुनी पोलीस चौकी, मारुती […]

खासदार मंडलिकांच्या प्रचारार्थ महिलांची भव्य दूचाकी रॅली

कोल्हापूर प्रतिनिधी

महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या महिला आघाडीच्यावतीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील प्रमुख मार्गावरुन भव्य दूचाकी रॅली काढण्यात आली. गांधी मैदान येथून रॅलीस सुरुवात झाली. पुढे खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदीर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, सीपीआर चौक, दसरा चौक, बिंदू चौक, उमा टॉकीज्, बागल चौक, राजारामपुरी जुनी पोलीस चौकी, मारुती मंदिर, राजारामपुरी मुख्य रस्ता मार्गे साईक्स एक्सटेंशन येथील महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालय येथे रॅलीची सांगता झाली. रॅलीमध्ये भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष रुपाराणी निकम, राष्ट्रवादीच्या रेखा आवळे, शिवसेनेच्या मंगल साळोखे यांनी केले. बैठकीला शिवानी मंडलिक, पूनम जाधव, गायत्री राऊत, संगीता खाडे, माधुरी नकाते, जहिदा मुजावर, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, धनश्री तोडकर, स्वाती कदम, शितल तिरुके, नम्रता भोसले आदींसह पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.