‘कॅपिटल वन’तर्फे 3 पासून भव्य एकांकिका स्पर्धा

बेळगाव : कॅपिटल वन संस्थेतर्फे दि. 3 व 4 फेब्रुवारी रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे भव्य एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बेळगावकर नाटकांचे भुकेले आहेत, परंतु अनेक कारणास्तव त्यांना नाटकांपासून वंचित राहावे लागले. ही उणीव दूर करत कॅपिटल वनने सलग 11 वर्षे स्पर्धा भरवून यंदा 12 व्या वर्षीही भव्य स्पर्धा होणार आहे. या नाट्या एकांकिका […]

‘कॅपिटल वन’तर्फे 3 पासून भव्य एकांकिका स्पर्धा

बेळगाव : कॅपिटल वन संस्थेतर्फे दि. 3 व 4 फेब्रुवारी रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे भव्य एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बेळगावकर नाटकांचे भुकेले आहेत, परंतु अनेक कारणास्तव त्यांना नाटकांपासून वंचित राहावे लागले. ही उणीव दूर करत कॅपिटल वनने सलग 11 वर्षे स्पर्धा भरवून यंदा 12 व्या वर्षीही भव्य स्पर्धा होणार आहे. या नाट्या एकांकिका स्पर्धेचा शुभारंभ शनिवार दि. 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
दररोज सकाळी 10 ते 8 या वेळेत स्पर्धा होणार असून रविवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत स्पर्धा होतील व त्यानंतर बक्षीस समारंभ होईल. स्पर्धा सर्वांसाठी खुल्या असून रसिकांच्या व आयोजकांच्या सोयीसाठी प्रयोग व स्पर्धकांना व्यत्यय होऊ नये, यासाठी नाट्यारसिकांना सभागृहात स्पर्धा सुरू असताना प्रवेश दिला जाणार नाही. दरम्यान, अखिल भारतीय स्तरावरील लेखन स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल. त्याचा बक्षीस समारंभही दि. 4 रोजीच होणार आहे.