उचगाव येथे अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा

उचगाव : अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीप्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून अयोध्या येथून आणण्यात आलेल्या श्रीराम मंदिर अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा उचगाव येथे सोमवारी रात्री मोठ्या उत्साही व चैतन्यपूर्ण वातावरणामध्ये, युवकांच्या उपस्थितीत आणि हरेकृष्णच्या भजनात शोभायात्रा पार पडली. सदर अक्षता कलश यात्रा मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणातून प्रभू रामचंद्रांचा जयघोष, श्रीराम […]

उचगाव येथे अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा

उचगाव : अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीप्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून अयोध्या येथून आणण्यात आलेल्या श्रीराम मंदिर अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा उचगाव येथे सोमवारी रात्री मोठ्या उत्साही व चैतन्यपूर्ण वातावरणामध्ये, युवकांच्या उपस्थितीत आणि हरेकृष्णच्या भजनात शोभायात्रा पार पडली. सदर अक्षता कलश यात्रा मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणातून प्रभू रामचंद्रांचा जयघोष, श्रीराम जय राम जय जय राम आणि हरेकृष्णच्या संगीतमय भजनी तालावरती ही मिरवणूक निघाली. प्रारंभी गणेश विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये हा अक्षता कलश ठेवण्यात आला होता. सदर कलश भव्य अशा चित्ररथामध्ये श्रीराम, लक्ष्मण, हनुमान अशा मुर्त्या आणि मध्यभागी अक्षता कलश ठेवण्यात आला होता. मध्यवर्ती गणेश विठ्ठल रुखुमाई मंदिरापासून या अक्षता कलश शोभायात्रेला प्रारंभ झाल्यानंतर गणपत गल्लीमार्गे, पावशे गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कचेरी गल्ली, सुरवीर गल्ली, अनगोळ गल्ली, मारुती गल्ली, गोजगे रोड, लक्ष्मी गल्लीमार्गे पुन्हा गांधी चौकात येऊन या मिरवणुकीचा समारोप झाला. या शोभायात्रेमध्ये भगव्या टोप्या, भगवे ध्वज, शाली यांचा पेहराव युवकांनी केला होता. प्रत्येक गल्लीमध्ये रांगोळ्या घालून गल्लीची सजावट करण्यात आली होती. घरोघरी अक्षता कलशचे पूजन पाणी ओतून व आरती सुवासिनींकडून करण्यात येत होते. या मिरवणुकीमध्ये हरेकृष्ण भजनाने एक वेगळीच रंगत आणली. या भजनाच्या तालावरती सर्व युवक तल्लीन होऊन नाचत असल्याचे चित्र गावकऱ्यांनी अनुभवले.