माता रमाई जयंती निमित्त उमरग्यात भव्य शोभायात्रा

                                    उमरग्यात माता रमाई जयंती शोभायात्रा भव्यरित्या साजरी धाराशिव उमरगा : उमरगा शहरात माता रमाई जयंती निमित्त हुतात्मा स्मारक पासून भव्य अशी शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावर काढण्यात आली. यावेळी टिपऱ्या, लेझीम पथक सामील झाले होते. यावेळी शोभायात्रेत सर्व सहभागी […]

माता रमाई जयंती निमित्त उमरग्यात भव्य शोभायात्रा

                                    उमरग्यात माता रमाई जयंती शोभायात्रा भव्यरित्या साजरी
धाराशिव उमरगा : उमरगा शहरात माता रमाई जयंती निमित्त हुतात्मा स्मारक पासून भव्य अशी शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावर काढण्यात आली. यावेळी टिपऱ्या, लेझीम पथक सामील झाले होते. यावेळी शोभायात्रेत सर्व सहभागी महिलांनी निळा फेटा परिधान केला होता. याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, माता रमाई यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात येत होते. शोभायात्रेच्या आयोजन त्यागमूर्ती माता रमाई जयंती समितीच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी विविध चौकात अभिवादन मान्यवरांनी केले. यामध्ये , उपनगराध्यक्ष विजय वाघमारे,माजी सभापती हरिश डावरे, वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, संविधान विचार मंचाचे अध्यक्ष अशोक बनसोडे, कुमार पवार आदी मान्यवरांनी अभिवादन केले.