विश्रुत चिट्स लिटल मास्टर्स लीग स्पर्धेचे शानदार उद्घाटन

विश्रुत चिट्स चषकांचे अनावरण बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विश्रुत चिट्स चषक 13 वर्षाखालील मुलांच्या लिटिल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज थाटात पार पडले. युनियन जिमखाना उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धा पुरस्कर्ते चंदन कुंदरनाड, रवी कुंदरनाड, विकास देसाई, सचिन पाच्छापुरे, जिमखाना उपाध्यक्ष संजय पोतदार, सचिव प्रसन्ना सुंठणकर तसेच संघमालक मकसूद […]

विश्रुत चिट्स लिटल मास्टर्स लीग स्पर्धेचे शानदार उद्घाटन

विश्रुत चिट्स चषकांचे अनावरण
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विश्रुत चिट्स चषक 13 वर्षाखालील मुलांच्या लिटिल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज थाटात पार पडले. युनियन जिमखाना उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धा पुरस्कर्ते चंदन कुंदरनाड, रवी कुंदरनाड, विकास देसाई, सचिन पाच्छापुरे, जिमखाना उपाध्यक्ष संजय पोतदार, सचिव प्रसन्ना सुंठणकर तसेच संघमालक मकसूद मारूफ, प्रणय शेट्टी, रोहित पोरवाल, अमित साठे, मोहम्मद ताहीर सराफ, जयवंत दुर्गाई व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. आयोजक युनियन जिमखाना तर्फे सर्व संघमालक व स्पर्धा पुरस्कर्ते चंदन कुंदरनाड यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा पुरस्कर्ते चंदन कुंदरनाथ यांच्या हस्ते या स्पर्धेच्या निमित्ताने उपमहापौर आनंद चव्हाण, महेश फगरे, अमर सरदेसाई, सारंग राघोचे, प्रणय शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना स्पर्धा पुरस्कर्ते चंदन यांनी युनियन जिमखाना यांनी उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाचा लाभ या उगवत्या क्रिकेटपटूनी घ्यावा, असे म्हणाले. त्यानंतर स्पर्धेत  विजेत्या संघांना देण्यात येणाऱ्या तसेच सामनावीर व वैयक्तिक बक्षिसे मिळवलेल्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या चषकांचे अनावरण करण्यात आले चेतन बैलूर यांनी सूत्रसंचालन केले.