वारणा शिक्षण मंडळातर्फे २५ रोजी भव्य रोजगार महामेळावा : आमदार डॉ. विनय कोरे यांची माहिती

वारणानगर / प्रतिनिधी वारणानगर (ता. पन्हाळा) येथे गुरुवार दि.२५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग पुणे, वारणा विभाग शिक्षण मंडळ यांच्या संयुक्तं विद्यमाने पंडीत दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार महामेळावा वारणानगर येथे आयोजित केल्याची माहितीही वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. कोरे म्हणाले, राज्यातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी राज्य […]

वारणा शिक्षण मंडळातर्फे २५ रोजी भव्य रोजगार महामेळावा : आमदार डॉ. विनय कोरे यांची माहिती

वारणानगर / प्रतिनिधी

वारणानगर (ता. पन्हाळा) येथे गुरुवार दि.२५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग पुणे, वारणा विभाग शिक्षण मंडळ यांच्या संयुक्तं विद्यमाने पंडीत दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार महामेळावा वारणानगर येथे आयोजित केल्याची माहितीही वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. कोरे म्हणाले, राज्यातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत आहे या उद्देशातूनं मेळाव्याच आयोजन केले आहे. शासन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे म्हणून आजकाल बेरोजगारीची समस्या भेडसावत असताना जास्तीत जास्त तरुणांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे या रोजगार मेळाव्यात शासनाकडून नामांकित खाजगी १५ कंपन्या व वारणा विभाग शिक्षण मंडळ यांचेकडून १५ बहुराष्ट्रीय कंपन्या अशा ३० हून अधिक नामांकीत कंपन्या व प्रमुख सहभागी होणार आहेत.
मेळाव्यात सुमारे १००० हून अधिक विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्रातून सहभागी होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील तरुण -तरुणींना रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण बँकामार्फत स्वयंरोजगारासाठी विविध शासकीय कर्ज योजनांची माहिती (मुद्रा लोन) देण्यात येणार आहे त्यामूळे युवक तरूण उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे सोबत आणून मेळाव्यातील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ.कोरे यांनी केले.
पत्रकार परिषदेस वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ व्ही व्ही कार्जिंन्नी, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ एस व्ही आणेकर, वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए एम शेख,फार्मसीचे प्राचार्य, डॉ जॉन डिसोजा, प्राचार्य बी आय कुंभार,डॉ अमोल पाटील, प्रा सौरभ बोरचाटे, प्रा गणेश कांबळे आदी उपस्थित होते.