गोवन्स सीए, टिळकवाडी एफए संघ विजयी

लोकमान्य चषक बीडीएफए फुटबॉल स्पर्धा बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक बीडीएफए वरिष्ठ साखळी स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात गोवन्स सीएने शिवाजी कॉलनीचा तर टिळकवाडी एफएने सिटी स्पोर्ट्सचा पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळवले. स्पोर्टिंग प्लॅनेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात गोवन्स […]

गोवन्स सीए, टिळकवाडी एफए संघ विजयी

लोकमान्य चषक बीडीएफए फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक बीडीएफए वरिष्ठ साखळी स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात गोवन्स सीएने शिवाजी कॉलनीचा तर टिळकवाडी एफएने सिटी स्पोर्ट्सचा पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळवले. स्पोर्टिंग प्लॅनेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात गोवन्स सीएने शिवाजी कॉलनीचा 7-1 असा पराभव केला. या सामन्यात चौथ्या मिनिटाला साहिल कुमारच्या पासवर अथर्व जाधवने पहिला गोल करून 1-0 आघाडी मिळवून दिली. 12 व्या मिनिटाला गौरांग उच्चुकरच्या पासवर साहिल कुमारने दुसरा गोल करून पहिल्या सत्रात 2-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 33 व्या व 46 व्या मिनिटाला गोव्याच्या रोशन सामरेकरच्या पासवर गौरांग उच्चुकरने सलग दोन गोल केले. 45 व्या व 49 व्या मिनिटाला अथर्व जाधवच्या पासवर आदर्श गणेशकरने दोन गोल केले. 50 व्या मिनिटाला गोवन्स सीएच्या रोशन सामरेकरने सातवा गोल करून 7-0 ची आघाडी मिळवून दिली. याच मिनिटात शिवाजी कॉलनीच्या अथर्व तुंबलकरने गोल करून 1-7 अशी आघाडी कमी केली. दुसऱ्या सामन्यात टिळकवाडी एफने सिटी स्पोर्ट्सचा 3-1 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्राच्या शेवटच्या मिनिटाला समर्थ बांदेकरच्या पासवर सिद्धार्थ शिंदेने पहिला गोल करून 1-0 आघाडी पहिल्या दिवसात मिळून दिली. दुसऱ्या सत्रात 45 व्या मिनिटाला सिटी स्पोर्ट्सने सीमन एरिगारने गोल करून 1-1 अशी बरोबरी केली. 55 मिनिटाला समर्थ बांदेकरने बचावफळीला चकवत दुसरा गोल गेला. तर 59 व्या मिनिटाला चैतन्य परमेकर तिसरा गोल करून 3-1 अशी आघाडी मिळवून दिली.
गुरुवारचे सामने

वायएमसीए विरुद्ध युनायटेड युथ दुपारी 3 वा.
झिकझॅक विरुद्ध चौगुले ब्रदर्स यांच्यात सायंकाळी 5 वा.