पशुकल्याण संस्थांना सरकारी आर्थिक मदत
पणजी : राज्य सरकारने डिस्ट्रिक्ट सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू एनिमल्स म्हणजे प्राणी कल्याण आणि बचाव योजनेत सुधारणा केली आहे. त्याअंतर्गत प्राण्यांवर क्रूरता रोखण्यासाठी आणि त्यांना अनावश्यक वेदना किंवा त्रास होण्यापासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने पशुकल्याण संस्थांना 64.36 लाख ऊपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. जिल्हा पशुकल्याण आणि बचाव योजनेसाठी हा आर्थिक लाभ मिळणार आहे. याद्वारे प्राण्यांना निवारा आणि सुविधा देण्यासाठी प्राणी आश्रयस्थान, अभयारण्य, पाण्याचे कुंड इत्यादी स्थापन करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. शिवाय प्राण्यांना आजार किंवा दुखापत झाल्यास त्यांच्यावर उपचार होण्यासाठी ही आर्थिक मदत वापरता येणार आहे.
Home महत्वाची बातमी पशुकल्याण संस्थांना सरकारी आर्थिक मदत
पशुकल्याण संस्थांना सरकारी आर्थिक मदत
पणजी : राज्य सरकारने डिस्ट्रिक्ट सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू एनिमल्स म्हणजे प्राणी कल्याण आणि बचाव योजनेत सुधारणा केली आहे. त्याअंतर्गत प्राण्यांवर क्रूरता रोखण्यासाठी आणि त्यांना अनावश्यक वेदना किंवा त्रास होण्यापासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने पशुकल्याण संस्थांना 64.36 लाख ऊपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. जिल्हा पशुकल्याण आणि बचाव योजनेसाठी हा आर्थिक लाभ मिळणार आहे. […]
