गुगलची फ्लिपकार्टमध्ये हिस्सेदारी खरेदी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
दिग्गज टेक कंपनी गुगलने ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये हिस्सेदारी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गुगल फ्लिपकार्टमध्ये 2907 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
किती झाले मूल्य
गुगलने यापूर्वीच फ्लिपकार्टमध्ये गुंतवणुकीची योजना बनवलेली होती. 7891 कोटी रुपये गुंतवणुकीच्या योजनेमधील कंपनीचा हा पहिला गुंतवणूकीतील वाटा असल्याचे सांगितले जात आहे. या निधीनंतर फ्लिपकार्टचे मूल्य 2.99 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
व्यवहार लवकरच होणार पूर्ण
ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने हिस्सेदारी विक्री संदर्भातील प्रक्रिया मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू केली होती. काही बाबतीतल्या अटी व इतर गोष्टी यांना मंजुरी मिळाल्यानंतरच सदरचा हिस्सेदारी व्यवहार पूर्ण होणार असल्याचे कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.
Home महत्वाची बातमी गुगलची फ्लिपकार्टमध्ये हिस्सेदारी खरेदी
गुगलची फ्लिपकार्टमध्ये हिस्सेदारी खरेदी
वृत्तसंस्था/ बेंगळूर दिग्गज टेक कंपनी गुगलने ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये हिस्सेदारी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गुगल फ्लिपकार्टमध्ये 2907 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. किती झाले मूल्य गुगलने यापूर्वीच फ्लिपकार्टमध्ये गुंतवणुकीची योजना बनवलेली होती. 7891 कोटी रुपये गुंतवणुकीच्या योजनेमधील कंपनीचा हा पहिला गुंतवणूकीतील वाटा असल्याचे सांगितले जात आहे. या निधीनंतर फ्लिपकार्टचे मूल्य 2.99 […]