म्हाडाच्या विशेष मोहिमेला अखेर चांगला प्रतिसाद
म्हाडाच्या (MHADA) कोकण मंडळाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्य’ तत्वावरील 11 हजार 176 घरांच्या विक्रीसाठी कोकण मंडळाने 2 डिसेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत (mhada) इच्छुक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 29 ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले आहेत. तसेच रिक्षांमधून घरांची (flats) माहिती दिली जात आहे. या मोहिमेला आठवड्याभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 5500 हून अधिक इच्छुकांनी घरांची चौकशी केली आहे. यापैकी 250 जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. आणखी काही इच्छुक अर्जदार अर्ज दाखल करतील, अशी मंडळाला अपेक्षा आहे. दरम्यान, बुधवारी या विशेष मोहिमेचा (campaign) शेवटचा दिवस असणार आहे.विक्रीविना पडून असलेली रिक्त घरे मंडळासाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. कोकणातील 14 हजारांहून अधिक घरे रिक्त असून यामुळे मंडळाला अंदाजे तीन हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. या घरांच्या विक्रीसाठी मंडळाने आता कंबर कसली आहे. त्यानुसार 11 हजार 176 घरांची ‘प्रथम प्रधान्य’ तत्वाने विक्री सुरू केली. पण या घरविक्रीला म्हणावे तसे यश न मिळाल्याने शेवटी मंडळाला घरविक्रीसाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे. या घरांची माहिती प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी, स्वत: इच्छुक ग्राहकांपर्यंत पोहचून त्यांना घरविक्रीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी मंडळाला अखेर विशेष मोहीम हाती घ्यावी लागली आहे. त्यानुसार 2 डिसेंबरपासून विशेष मोहिमेला सुरुवात झाली असून बुधवार 11 डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.या मोहिमेअंतर्गत 29 ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले आहेत. स्टाॅलवरील अधिकारी ग्राहकांना घरांची माहिती देत आहेत. इच्छुक ग्राहकांना घरखरेदीसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर पथनाट्याच्या माध्यमातूनही अर्जसंख्या वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. ही मोहीम सुरू होऊन आठवडा झाला असून या आठवड्याभरात मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली. आठवड्याभरात 5500 हून अधिक जणांनी घरासाठी चौकशी केली आहे. यापैकी 250 जणांनी अनामत रक्कम अदा करून अर्ज दाखल केले आहेत. तर 5500 पैकी आणखी काही जण लवकरच अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. हा प्रतिसाद चांगला असल्याने या मोहिमेला बऱ्यापैकी यश मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, या मोहिमेला मुदतवाढ देण्याचा तूर्तास विचार नाही. मात्र रिक्त घरांची संख्या पाहता मोहिमेला मुदतवाढ देण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.हेही वाचाधारावी रहिवाशांची आरोग्य विम्यासाठी नोंदणीखारफुटीवरील भराव रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
Home महत्वाची बातमी म्हाडाच्या विशेष मोहिमेला अखेर चांगला प्रतिसाद
म्हाडाच्या विशेष मोहिमेला अखेर चांगला प्रतिसाद
म्हाडाच्या (MHADA) कोकण मंडळाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्य’ तत्वावरील 11 हजार 176 घरांच्या विक्रीसाठी कोकण मंडळाने 2 डिसेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेअंतर्गत (mhada) इच्छुक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 29 ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले आहेत. तसेच रिक्षांमधून घरांची (flats) माहिती दिली जात आहे. या मोहिमेला आठवड्याभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
5500 हून अधिक इच्छुकांनी घरांची चौकशी केली आहे. यापैकी 250 जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. आणखी काही इच्छुक अर्जदार अर्ज दाखल करतील, अशी मंडळाला अपेक्षा आहे. दरम्यान, बुधवारी या विशेष मोहिमेचा (campaign) शेवटचा दिवस असणार आहे.
विक्रीविना पडून असलेली रिक्त घरे मंडळासाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. कोकणातील 14 हजारांहून अधिक घरे रिक्त असून यामुळे मंडळाला अंदाजे तीन हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. या घरांच्या विक्रीसाठी मंडळाने आता कंबर कसली आहे.
त्यानुसार 11 हजार 176 घरांची ‘प्रथम प्रधान्य’ तत्वाने विक्री सुरू केली. पण या घरविक्रीला म्हणावे तसे यश न मिळाल्याने शेवटी मंडळाला घरविक्रीसाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे.
या घरांची माहिती प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी, स्वत: इच्छुक ग्राहकांपर्यंत पोहचून त्यांना घरविक्रीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी मंडळाला अखेर विशेष मोहीम हाती घ्यावी लागली आहे. त्यानुसार 2 डिसेंबरपासून विशेष मोहिमेला सुरुवात झाली असून बुधवार 11 डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
या मोहिमेअंतर्गत 29 ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले आहेत. स्टाॅलवरील अधिकारी ग्राहकांना घरांची माहिती देत आहेत. इच्छुक ग्राहकांना घरखरेदीसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर पथनाट्याच्या माध्यमातूनही अर्जसंख्या वाढविण्याचा प्रयत्न होत आहे.
ही मोहीम सुरू होऊन आठवडा झाला असून या आठवड्याभरात मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली. आठवड्याभरात 5500 हून अधिक जणांनी घरासाठी चौकशी केली आहे. यापैकी 250 जणांनी अनामत रक्कम अदा करून अर्ज दाखल केले आहेत.
तर 5500 पैकी आणखी काही जण लवकरच अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. हा प्रतिसाद चांगला असल्याने या मोहिमेला बऱ्यापैकी यश मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, या मोहिमेला मुदतवाढ देण्याचा तूर्तास विचार नाही. मात्र रिक्त घरांची संख्या पाहता मोहिमेला मुदतवाढ देण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.हेही वाचा
धारावी रहिवाशांची आरोग्य विम्यासाठी नोंदणी
खारफुटीवरील भराव रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर