Kolhapur News : कोल्हापुरकरांसाठी गूड न्यूज ; कोल्हापूर-नवी मुंबई विमान सेवा २९ मार्चपासून दररोज

                  रोज सकाळी आणि संध्याकाळी कोल्हापूर – नवी मुंबई इंडिगो फ्लाइट्स सुरु कोल्हापूर – कोल्हापूरातील विमानतळावरून कोल्हापूर ते नवी मुंबई अशी आठवड्यातील सातही दिवस, सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांमध्ये इंडिगो कंपनीकडून विमान सेवा सुरू होत आहे. २९ मार्चपासून कोल्हापूर ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान इंडिगोकडून नवी […]

Kolhapur News : कोल्हापुरकरांसाठी गूड न्यूज ; कोल्हापूर-नवी मुंबई विमान सेवा २९ मार्चपासून दररोज

                  रोज सकाळी आणि संध्याकाळी कोल्हापूर – नवी मुंबई इंडिगो फ्लाइट्स सुरु
कोल्हापूर – कोल्हापूरातील विमानतळावरून कोल्हापूर ते नवी मुंबई अशी आठवड्यातील सातही दिवस, सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांमध्ये इंडिगो कंपनीकडून विमान सेवा सुरू होत आहे. २९ मार्चपासून कोल्हापूर ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान इंडिगोकडून नवी सेवा सुरू होत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी रात्री दिली.
कोल्हापूर विमानतळावर नवी टर्मिनस बिल्डिंगसह विविध विकासकामे सुरू आहेत. तसेच विविध नवे हवाई मार्ग सुरू होत आहेत. त्यातून कोल्हापूरच्या पर्यटन, उद्योग क्षेत्रासाठी आता गुड न्यूज आहे. ती म्हणजे दररोज होणारी कोल्हापूर ते नवी मुंबई विमानसेवा. ही विमानसेवा २९ मार्चपासून सुरू होणार आहे. रोज सकाळी ८ वाजता नवी मुंबई विमानतळावरून कोल्हापूरसाठी इंडिगोचे विमान उड्डाण घेईल आणि सकाळी सव्वानऊ वाजता हे विमान कोल्हापुरात येईल. त्यानंतर सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान, नवी मुंबई विमानतळावर, १०वाजून ३५ मिनिटांनी पोहोचणार आहे. तसेच सायंकाळी ७.२० वाजता नवी खासदार धनंजय महाडिक यांची माहितीवाजून ३५ मिनिटांनी पोहोचणार आहे. तसेच सायंकाळी ७.२० वाजता नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान, कोल्हापुरात रात्री साडेआठ बाजता येईल. त्यानंतर ८ बाजून ५० मिनिटांनी कोल्हापुरातून सुटणारे विमान, रात्री ९.५० वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरेल. विशेष म्हणजे आठवड्यातील सातही दिवस, इंडिगो कंपनीची विमानसेवा सुरू होत आहे. त्यामुळे कोल्हापुरातून मुंबईला जाऊन दिवसभरातील कामे पूर्ण करून, पुन्हा सायंकाळी कोल्हापूरला परत येणे आता सहज शक्य होणार आहे.
खासदार महाडिक यांचा पाठपुरावा
कोल्हापूरकरांची रोज कोल्हापूर तेनवी मुंबई विमानसेवेची प्रदीर्घ मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून कोल्हापूर-नवी मुंबई मार्गावर दैनंदिन आणि सोयीस्कर वेळेतील विमानसेवा सुरू होत आहे. सुरुवातीला या मार्गावरील तिकीट दर ७,६०० रुपये असणार आहे. पर्यटन, उद्योग, व्यवसायाच्या दृष्टीने ही नवी विमानसेवा अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे.