ग्रेट खलीच्या घरी गुड न्यूज, दुसऱ्यांदा बाबा बनले
भारतातील प्रसिद्ध कुस्तीपटू दलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली यांना मुलगा झाला आहे. सध्या ते पत्नी हरपिंदर कौरसोबत अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील प्रसूतिगृहात मुलाचा जन्म झाल्यानंतर खलीने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. खलीने आपल्या मुलाला अनमोल हिरा म्हणत आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये खली आपल्या मुलावर प्रेम करत आहे. याआधी ग्रेट खलीला एक मुलगीही आहे. सोशल मीडियावर त्यांचे समर्थक त्यांचे सतत अभिनंदन करत आहेत.
‘द ग्रेट खली’च्या पत्नीचे नाव हरमिंदर कौर असून ती जालंधरच्या नूरमहलची रहिवासी आहे. दोघांनी 2002 मध्ये लग्न केले. हरमिंदर कौरने दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली आहे. दोघांच्या उंचीत फरक असूनही खली आणि त्याची पत्नी यांच्यातील बॉन्डिंग खूपच चांगले आहे लग्नाच्या काही वर्षानंतर खलीने कुस्तीमध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्यांना ओळख मिळाली. या दोघांचे 2002 मध्ये लग्न झाले होते आणि 12 वर्षांनी म्हणजे फेब्रुवारी 2014 मध्ये त्यांच्या मुलीचा जन्म झाला. खली आणि हरमिंदरच्या मुलीचे नाव अवलीन राणा असून ती आता 8 वर्षांची आहे .
आता खलीच्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. खलीने ही गोड बातमी चाहत्यांना देत एक रील शेअर केली आहे. या मध्ये खली बाळाला कडेवर घेऊन आहे. कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिले ”Today I am blessed with a son because of you blessings.” आहे. त्यांना पहिली एक मुलगी आहे. जी 8 वर्षाची आहे. खलीची इच्छा आहे की तिने देखील कुस्तीत जावे.
Edited by – Priya Dixit