गोमंतकीय तरुणाईने उद्योगात उतरावे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : ईडीआयआयच्या गोवा केंद्राचे उद्घाटन
पणजी : राज्यातील युवापिढीला उद्योजक बनण्यासाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन मिळावे, यासाठी भारतीय उद्योजकता विकास संस्थेच्या (ईडीआयआय) केंद्राची गोव्यातही स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतला. तऊणाईला मार्गदर्शनासोबतच उद्योग स्थापन करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळाकडून (ईडीसी) कर्जही मिळेल. या संधीचा अधिकाधिक तऊण-तऊणींनी लाभ घेऊन उद्योजक बनावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. भारतीय उद्योजकता विकास संस्थेच्या पणजीत स्थापन केलेल्या केंद्राच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत भारतीय उद्योजकता विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
बीबीए, एमबीएच्या विद्यार्थ्यांनी पुढे यावे
गोवा हे पर्यटन राज्य आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील अनेक उद्योग युवापिढीला स्थापन करता येतात. पण राज्यातील तऊणाई सरकारी नोकरीला अधिक प्राधान्य देऊन त्यातच समाधान मानत आहेत. अनेकजण उद्योजक बनण्याच्या हेतूने एमबीए, बीबीएसारखे कोर्स पूर्ण करतात. पण त्यानंतर नोकरी स्वीकारतात. अशा तऊणांनी भारतीय उद्योजकता विकास संस्थेच्या केंद्रातून मार्गदर्शन घ्यावे.
मार्गदर्शन, कर्ज मिळणार एकाच इमारतीत
हे केंद्र ईडीसीच्या इमारतीतच स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योजक बनण्यासाठीचे आवश्यक मार्गदर्शन आणि उद्योग उभारणीसाठी कर्ज अशा दोन्ही गोष्टी तऊणाईला एकाच इमारतीत मिळणार आहेत. त्यामुळे उद्योग स्थापन करण्यात रस असलेल्यांनी निश्चित या केंद्राला भेट देऊन मार्गदर्शन घेतले पाहिजे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
तरुणाईने उद्योगक्षेत्रात उतरण्याची गरज
केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांपासून गोव्यातील अधिकाधिक तऊणाईने उद्योग क्षेत्रामध्ये यावे, या हेतूनेच धोरणे तयार केलेली आहेत. राज्य सरकारने नुकतेच सोलर, लॉजिस्टिक धोरणांना मान्यता दिलेली आहे. त्याअंतर्गत उद्योगांना पुढील काळात मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन गोमंतकीय तऊणांनी आताच त्यात उतरले पाहिजे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत-2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी अधिकाधिक युवकांनी उद्योजक होणे आणि स्वत:ला स्वयंपूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व मदत देण्यास तयार असल्याची हमीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
गेल्या वीस वर्षांत गोमंतकीय तरुणाई मागे पडली
गेल्या 20 वर्षांच्या काळात गोव्यातील युवक-युवतींनी उद्योजक बनण्यात रस दाखवला नाही. त्यामुळे इतर राज्यातील लोकांनी गोव्यात येऊन विविध प्रकारचे उद्योग स्थापन केले. मासेमारी हा गोव्यातील प्रमुख व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे. त्यातून निश्चित स्वत:चा आर्थिक विकास साधता येतो. पण त्यातही गोमंतकीय मागे पडत चालले आहेत, अशी खंतही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केली.
Home महत्वाची बातमी गोमंतकीय तरुणाईने उद्योगात उतरावे
गोमंतकीय तरुणाईने उद्योगात उतरावे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : ईडीआयआयच्या गोवा केंद्राचे उद्घाटन पणजी : राज्यातील युवापिढीला उद्योजक बनण्यासाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन मिळावे, यासाठी भारतीय उद्योजकता विकास संस्थेच्या (ईडीआयआय) केंद्राची गोव्यातही स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतला. तऊणाईला मार्गदर्शनासोबतच उद्योग स्थापन करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळाकडून (ईडीसी) कर्जही मिळेल. या संधीचा अधिकाधिक तऊण-तऊणींनी लाभ घेऊन उद्योजक बनावे, असे […]
