आज रंगणार मडगावात ‘गोमंत केसरी’ शरीरसौष्ठव स्पर्धा
मडगांव : मडगावच्या युवा दी गोवाने आयोजित केलेल्या गोमंत केसरी दुसऱ्या अखिल गोवा पातळीवरील शरीरसौष्ठव व मॅन्स फिजिक स्पर्धेचे आयोजन आज मडगावात होणार आहे. गोवा बॉडिबिल्डर्स असोसिएशनच्या अधिपत्याखाली या स्पर्धेचे आयोजन एसजीपीडीए मैदानावर सायंकाळी 6 वाजल्यापासून होईल. काल या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी सुदेश भिसे, अमित पाटकर, संतोष म्हापसेकर, रवी देसाई, विराज आराबेकर, संजय पाटील, मोहिज खान व भक्ती पाटकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेत गोमंत केसरी किताब मिळविणाऱ्याला रोख 55,555 व खास तराय करण्यात आलेला हनुमान चषक देण्यात येईल. गोव्याच्या स्पर्धात्मक शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रथमच मास्टर्स विभागाचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धा 55, 60, 65, 70 किलोखालील वजनीगटात तसेच 75 किलोवरील वजनीगटात होईल. या विभागातील प्रथम पाच स्थाने मिळविणाऱ्या शरीरसौष्ठवपटूंना अनुक्रमे रोख 15015, 8008, 6006, 5005 व 4004 रोख देण्यात येतील. याशिवाय अनेक वैयक्तिक बक्षीसे तसेच सांघिक विजेतेपद व उपविजेतेपद मिळविणाऱ्या संघांनाही रोख बक्षीसे व चषक देण्यात येतील. या स्पर्धेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मडगावाचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, माजी खासदार नरेंद्र सावईकर तसेच जीबीबीएचे अध्यक्ष आमदार दाजी साळकर यांची उपस्थिती असेल.
Home महत्वाची बातमी आज रंगणार मडगावात ‘गोमंत केसरी’ शरीरसौष्ठव स्पर्धा
आज रंगणार मडगावात ‘गोमंत केसरी’ शरीरसौष्ठव स्पर्धा
मडगांव : मडगावच्या युवा दी गोवाने आयोजित केलेल्या गोमंत केसरी दुसऱ्या अखिल गोवा पातळीवरील शरीरसौष्ठव व मॅन्स फिजिक स्पर्धेचे आयोजन आज मडगावात होणार आहे. गोवा बॉडिबिल्डर्स असोसिएशनच्या अधिपत्याखाली या स्पर्धेचे आयोजन एसजीपीडीए मैदानावर सायंकाळी 6 वाजल्यापासून होईल. काल या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी सुदेश भिसे, अमित पाटकर, संतोष म्हापसेकर, रवी देसाई, विराज […]