मिक्स रिलेत भारतीय संघाचे राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण
आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये विक्रमी कामगिरी : पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात मात्र अयशस्वी
वृत्तसंस्था/ बँकॉक
भारताच्या मिश्र रिले संघाने 4×400 मीटर सोमवारी येथे आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली. भारतीय संघ मात्र पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरु शकला नाही.
मुहम्मद अजमल, ज्योतिका श्री दांडी, अमोज जेकब आणि शुभा व्यंकटेशन या चौघांनी 3 मिनिटे 14.12 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. याआधीचा राष्ट्रीय विक्रम 3 मिनिटे 14.34 सेकंदाचा होता जो भारतीय संघाने गतवर्षी हाँगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकताना केला होता. दरम्यान, या स्पर्धेच्या माध्यमाद्वारे भारतीय संघाला पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची नामी संधी होती. ऑलिम्पिकसाठी संघाचे लक्ष्य 15 व्या किंवा 16 व्या स्थानावर राहण्याचे होते. पण भारतीय संघ 21 व्या स्थानी राहिला. यामुळे भारतीय संघाचा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मार्ग खडतर झाला आहे.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकसाठी 4×400 मीटर रिलेत 14 संघांनी पात्रता मिळवली आहे. 15 व्या जागेसाठी झेक प्रजासत्ताक तर 16 व्या जागेसाठी इटली हे दोन संघ शर्यतीत आहेत. 30 जून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची शेवटची तारीख आहे. याआधी भारतीय अॅथलेटिक्स महासंघ रिले संघाला पात्र ठरवण्यासाठी प्रयत्नशील असेल. आता, पुढील आठवड्यापासून बहामा येथे विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप होत आहे. या स्पर्धेदरम्यान मिश्र रिले संघाला इटलीपेक्षा सरस कामगिरी करावी लागणार आहे.
Home महत्वाची बातमी मिक्स रिलेत भारतीय संघाचे राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण
मिक्स रिलेत भारतीय संघाचे राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण
आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये विक्रमी कामगिरी : पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात मात्र अयशस्वी वृत्तसंस्था/ बँकॉक भारताच्या मिश्र रिले संघाने 4×400 मीटर सोमवारी येथे आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली. भारतीय संघ मात्र पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरु शकला नाही. मुहम्मद अजमल, ज्योतिका श्री दांडी, अमोज जेकब आणि शुभा व्यंकटेशन या चौघांनी 3 मिनिटे 14.12 […]