सोनाच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ, तर चांदीच्या दरात घसरण

जागतिक बाजरातील अस्थिरता आणि गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायाच्या शोधामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारपेठेत सोन्याच्या दरात 2 हजारांची वाढ झाली असून प्रति दहा ग्रॅम 94,150 रुपये झाला. मागील दोन महिन्यात प्रथमच एका …

सोनाच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ, तर चांदीच्या दरात घसरण

जागतिक बाजरातील अस्थिरता आणि गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायाच्या शोधामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारपेठेत सोन्याच्या दरात 2 हजारांची वाढ झाली असून प्रति दहा ग्रॅम 94,150 रुपये झाला.  मागील दोन महिन्यात प्रथमच एका दिवसांत सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. 

ALSO READ: Gold Rate Today सोन्याच्या किंमतींनी आणखी एक विक्रम मोडला, पहिल्यांदा एवढी किंमत

अमेरिकेच्या व्यापार धोरणामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक कमी होत असून परिणामी गुंतवणूकदार आणि दागिन्यांचे व्यापारी मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करतात.सध्या लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. नागरिक सोन्याची खरेदी पारंपरिक आणि प्रतीकात्मक दृष्टीकोनातून करत आहे. या मुळे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सोने उपलब्ध करावे लागत आहे. 

ALSO READ: रतन टाटा यांचे मृत्युपत्र : Ratan Tata यांनी संपत्तीचा मोठा भाग दान केला, कोणाला काय मिळाले ते पहा

गेल्या 3 महिन्यांत सोन्याच्या दरात सुमारे 14 ,760 रुपयांनी वाढ झाली आहे. जानेवारी 1 रोजी प्रति दहा ग्राम सोन्याचा दर 79,390 असून आता त्याचे दर 94,150 रुपये झाले आहे.   

या दरम्यान चांदीच्या दरात घसरण झाली असून मंगळवारी चांदीचे दर 500 रुपयांनी घसरले असून आता चांदीचे दर 1,02,500 रुपये प्रति किलो झाले आहे.

Edited By – Priya Dixit 

ALSO READ: Gold Rate Today : आज सोने किती स्वस्त झाले? दहा ग्रॅमची नवीनतम किंमत जाणून घ्या

Go to Source