दिल्लीत सोन्याचा दर 73 हजारांच्या पार

दिल्लीत सोन्याचा दर 73 हजारांच्या पार

चांदी प्रतिकिलो 84 हजारांजवळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आठवडाभरात भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचा दर प्रतितोळा 73 हजारांच्या पुढे पोहोचला असून चांदीदर प्रतिकिलो 84 हजारांवर गेला आहे. तसेच शनिवारी मुंबईत सोनेदर 72,550 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचले होते. तर चांदी प्रतिकिलो 85 हजार 500 रुपयांवर गेली होती.
गेल्या आठवड्यात दिल्लीत सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅममागे 1,895 रुपयांनी वाढला आहे, तर चांदीचा भाव प्रतिकिलो 2,323 रुपयांनी वाढला आहे. ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’च्या वेबसाईटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला सोमवार 8 एप्रिल रोजी 24 पॅरेट सोन्याचा 71,279 रुपयांवर असलेला दर शुक्रवार 12 एप्रिलपर्यंत वाढून 73,174 रुपये प्रति 10 झाला. सोने दर वाढत असतानाच चांदीची किंमत 81,496 रुपयांवरून 83,819 रुपये प्रतिकिलो झाली आहे.