जस्मीन, अरुंधती यांना सुवर्णपदके

वृत्तसंस्था /ग्रेटर नोएडा येथे झालेल्या महिलांच्या वरिष्ठ राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेती जस्मीन लंबोरियाने पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळवताना आपल्या वजन गटातून ऑलिम्पियन सिमरनजीत कौरचा अंतिम लढतीत पराभव केला. त्याचप्रमाणे अरुंधतीने आपल्या वजन गटातून सुवर्णपदक पटकावले. विश्व चॅम्पियन सवीती बोरा हिने आपल्याकडे राष्ट्रीय जेतेपद पुन्हा टाकले. येथील गौतम बुद्ध विद्यापीठाच्या इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या […]

जस्मीन, अरुंधती यांना सुवर्णपदके

वृत्तसंस्था /ग्रेटर नोएडा
येथे झालेल्या महिलांच्या वरिष्ठ राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेती जस्मीन लंबोरियाने पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळवताना आपल्या वजन गटातून ऑलिम्पियन सिमरनजीत कौरचा अंतिम लढतीत पराभव केला. त्याचप्रमाणे अरुंधतीने आपल्या वजन गटातून सुवर्णपदक पटकावले. विश्व चॅम्पियन सवीती बोरा हिने आपल्याकडे राष्ट्रीय जेतेपद पुन्हा टाकले. येथील गौतम बुद्ध विद्यापीठाच्या इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत 60 किलो वजन गटातील अंतिम लढतीत सेनादलाच्या जस्मीन लंबोरियाने सिमरनजीत कौरचा 4-3 अशा केवळ एक गुणाच्या फरकाने पराभव करत सुवर्णपदक पटकावले. सिमरनजीत कौरने यापूर्वी दोनवेळा आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत तसेच विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत पदक मिळवले होते. सेनादलाच्या जस्मीन लंबोरियाने या लढतीत आक्रमक ठोशावर अधिक भर दिला होता. 2024 साली होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत कोटा पद्धती अनुसार 60 आणि 66 किलो या दोन वजन गटात भारतीय स्पर्धकांनी अद्याप आपले तिकीट निश्चित केलेले नाही. महिलांच्या 66 किलो वजन गटामध्ये सेनादलाच्या अरुंधती चौधरीने अंतिम लढतीत आसामच्या अंकुशिता बोरोचा पराभव करत सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेमध्ये रेल्वेचा संघ सर्वोत्तम ठरला.