तेजस्वीन शंकरला सुवर्णपदक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा पुरूष अॅथलिट तसेच राष्ट्रीय विक्रमवीर तेजस्वीन शंकरने बेल्जियम येथे झालेल्या 2024 च्या इंटरनॅशनल गला इलमोस अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नव्या वर्षातील अॅथलेटिक्स हंगामातील पहिल्याच स्पर्धेत तेजस्वीन शंकरने सुवर्णपदक मिळविले आहे.
गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर नंतर तेजस्वीन शंकर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी झाला होता. पुरूषांच्या उंच उडी या क्रीडा प्रकारात तेजस्वीन शंकरने 2.23 मी. चे अंतर नोंदवित सुवर्णपदक तर ग्रीसच्या मेरलोसने 2.20 मी. चे अंतर नोंदवित रौप्यपदक मिळविले होते. आता तेजस्वीन शंकर झेक प्रजासत्ताकमध्ये 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत भाग घेत आहे.
Home महत्वाची बातमी तेजस्वीन शंकरला सुवर्णपदक
तेजस्वीन शंकरला सुवर्णपदक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताचा पुरूष अॅथलिट तसेच राष्ट्रीय विक्रमवीर तेजस्वीन शंकरने बेल्जियम येथे झालेल्या 2024 च्या इंटरनॅशनल गला इलमोस अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नव्या वर्षातील अॅथलेटिक्स हंगामातील पहिल्याच स्पर्धेत तेजस्वीन शंकरने सुवर्णपदक मिळविले आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर नंतर तेजस्वीन शंकर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी झाला होता. पुरूषांच्या उंच उडी या क्रीडा प्रकारात तेजस्वीन […]
